World Cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मॅचवर विराट कोहलीची सर्वात पहिली प्रतिक्रिया
टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिल्या 2 मॅचेस जिंकल्या आहेत. यानंतर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. टीम इंडिया आपली पुढील मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. ही मॅच रविवार 16 जूनला खेळण्यात येणार आहे. या मॅचबद्दल कॅप्टन विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
लंडन : टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिल्या 2 मॅचेस जिंकल्या आहेत. यानंतर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. टीम इंडिया आपली पुढील मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. ही मॅच रविवार 16 जूनला खेळण्यात येणार आहे. या मॅचबद्दल कॅप्टन विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला विराट ?
विराटने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मॅचवर न्यूझीलंड विरुद्धची मॅच रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 'आम्ही याआधी चांगली कामगिरी केली आहे. पॉईंट्स टेबलवर आम्ही कितव्या क्रमांकावर आहोत, याची आम्ही काळजी करत नाहीत.'
'टीम इंडिया 2 मॅच जिंकल्या आहेत. टीमच्या आत्मविश्वासासाठी 2 विजय पुरेसे आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचआधी नेटप्रॅक्टीस करणार आहोत. त्यामुळे या नेटप्रॅक्टीसमधून टीमचा विश्वास आणखी दुणावेल.' असे कोहली म्हणाला.
विराट म्हणाला की, 'पाकिस्तान विरुद्ध होणारी मॅच ही इतर मॅचप्रमाणेच आहे. पाकिस्तान विरुद्धची मॅच आधीपासूनच फार स्पर्धात्मक राहिली आहे. क्रिकेटविश्वात या मॅचकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. त्यामुळे अशा मॅचचा आपण एक भाग आहोत, ही अभिमानास्पद बाब आहे.'
'पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू हा विशेष कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धात आमच्याकडून चांगली कामगिरी होईल', अशी आशा विराटने व्यक्त केली.
'पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरुन आम्ही आखलेल्या योजनेनुसार खेळ करणे, हीच आमची नीती असेल', असे कोहली म्हणाला.
'मैदानात प्रवेश केल्यानंतर शांती असते. पाकिस्तान विरुद्धची मॅच ही हायव्होल्टेज असते. त्यामुळे मैदानातील वातावरण हे उत्साहपूर्ण असते. दोन्ही टीमच्या समर्थकांकडून घोषणा दिल्या जातात. त्यामुळे जे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच खेळतात, त्यांच्यावर याचा नकारात्मक दबाव निर्माण होतो', असं देखील कोहली यावेळी म्हणाला.