विराट-रोहितचा पार्टनरशिपचा रेकॉर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलं.
कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलं. विराट आणि रोहित शर्मामध्ये २३० रन्सची पार्टनरशीप झाली. वनडेमध्ये २०० पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप करण्याची विराट आणि रोहितची ही चौथी वेळ आहे.
याचबरोबर विराट आणि रोहितनं सौरव गांगुली-सचिन तेंडुलकरच्या पार्टनरशिपचंही रेकॉर्ड मोडलं आहे. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये २०० रन्सपेक्षा जास्तच्या ३ पार्टनरशिप केल्या होत्या. गौतम गंभीर आणि विराटनंही याआधी २०० रन्सपेक्षा जास्तच्या ३ पार्टनरशिप केल्या होत्या. श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि महेला जयवर्धनेच्या नावावरही २०० रन्सच्या ३ पार्टनरशिप आहेत.
रोहित शर्मानं वनडे कारकिर्दीतली 15वी सेंच्युरी झळकावली. रोहितनं 138 बॉल्समध्ये 147 रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये 18 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहली वनडे क्रिकेटमधली 32वी सेंच्युरी पूर्ण करून आऊट झाला. कोहली 106 बॉल्समध्ये 113 रन्स करून आऊट झाला. विराटच्या इनिंगमध्ये 9 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.