मुंबई :  इटलीच्या टस्कनी शहरामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकला. त्यानंतर २१ डिसेंबरला दिल्लीत पहिले रिसेप्शन झाले त्यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.   


सेलिब्रिटींची मांदियाळी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरूष्काच्या रिसेप्शनला नरेंद्र मोदीसोबत अनेक सेलिब्रिटी हजर होते. यामध्ये क्रिकेटर्सचा समावेश होता. 


रॉयल लूक  


विरूष्काचा लग्नातील लूक जितका साजेसा होता . त्याप्रमाणेच त्यांचा दिल्लीतील रिसेप्शनचा लूकही चर्चेचा विषय होता.  लग्नाप्रमाणेच रिसेप्शनचा लूक  आणि ड्रेसही प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाईन केला होता.  



 


अनुष्का शर्माने लाल - गोल्डन बनारसी शालू नेसला होता तर विराटने बंद गळ्याची शेरवानी आणि शाल घेतली होती. 


 शेरवानीला सोन्याची बटणं   


 मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीच्या शेरवानीसोबत १८ कॅरेट सोन्याची बटणं लावली होती. काळ्या शेरवानीला सफेद रंगाचा चुडीदार आणि पश्मिना शॉलचा लुक देण्यात आला होता. सोबतच मोजडी होती.  विराट कोहलीच्या या रॉयल लूकची किंमत सुमारे ६०-७० लाखाहून अधिक आहे.  


 
 अनुष्काचा बनारसी लूक  


  लाल रंगाची बनारसी साडी, गळ्यात डायमंडचा चोकर, झुमके, केसात गजरा आणि भांगेत ठसठशीत कुंकू असा अस्सल भारतीय लूकही आकर्षक होता. टाईम्स नाऊ न्युजच्या रिपोर्टनुसार अनुष्काच्या झुमका आणि चोकरची किंमत सुमारे २५ ते ३० लाख होती.