मुंबई : टॉम लाथम (नाबाद 103) आणि रॉस टेलर (95) या दोघांच्या दमदार खेळीमुळे वानखेडेवर न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. 
तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत -न्यूझीलंड दरम्यानचा हा सामना विराट कोहलीचा २०० वा सामना होता. या वनडे मॅचमध्ये विराटने ३१ वे शतक ठोकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने  रॉस टेलरचे ट्विटरवर कौतुक केले आहे. यावेळेस 
त्याचा गंमतीशीरपणे उल्लेख 'दर्जी' असा केला. दिवाळीचे प्रेशर सांभाळत तुम्ही उत्तम खेळलात असे मजेशीर ट्विट वीरेंद्र सेहवागने केले. यानंतर ट्विटरकरांनीदेखील त्यावर मजेशीर ट्विट केले आहेत.  सोबतच टेलरच्या अकाऊंटवरूनही वीरूला हिंदीमध्ये उत्तर देण्यात आले आहे. 



 


' वीरू.. या टेलरने कपडे शिवण्याऐवजी तर थेट फाडलेच...' असेदेखील एकाने म्हटले आहे. 


भारताने वानखेडेवर टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या खेळामध्ये विराटने १२१ धावा केल्या. भारताने न्यूजीलंडला २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र न्यूझीलंड संघदेखील पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला होता. भारत न्यूझीलंडच्या  केवळ ३ विकेट्स घेऊ शकला. त्यांनी २८४ धावा अगदी आरामात बनवत भारतावर विजय मिळवला.