व्हिवोला मिळाली आयपीएलची स्पॉन्सरशीप
चायनीज मोबाईल कंपनी व्हिवो पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलची स्पॉन्सर असणार आहे.
मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी व्हिवो पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलची स्पॉन्सर असणार आहे. याआधीही व्हिवोच आयपीएलची स्पॉन्सर होती. आयपीएलच्या स्पॉन्सरशीपसाठी व्हिवोनं तब्बल २१९९ कोटी रुपये म्हणजेच प्रत्येक वर्षी ४४० कोटी रुपये दिले आहेत.
याआधी २०१५सालीही व्हिवोलाच आयपीएलची स्पॉन्सरशीप देण्यात आली होती. त्यावेळी व्हिवोनं २०० कोटी रुपये दोन वर्षांसाठी दिले होते. आयपीएलच्या स्पॉन्सरशीपसाठी बीसीसीआयनं १ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२२ या कालवधीसाठी टेंडर मागवली होती.
आयपीएलच्या सुरुवातीला २००८मध्ये डीएलएफला पाच वर्षांसाठी आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली होती. त्यावेळी डीएलएफनं प्रत्येक वर्षासाठी ४० कोटी रुपये मोजले होते. २०१२मध्ये पेप्सीनं पाच वर्षांसाठी ३९६ कोटी रुपयांमध्ये आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली होती. २०१६मध्ये पेप्सीनं हा करार रद्द केला आणि मग व्हिवोला आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली.