गाबा: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड गाबा स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये डेव्हिड वॉर्नरचं शतक हुकलं आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी झाला. यामध्ये वॉर्नर 37 व्या ओव्हरमध्ये रन आऊट होता होता वाचले. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरने एक लेग शॉर्ट खेळला. बॉल जवळच गेला मात्र तेवढ्यात एक रन होईल या हिशोबानं वॉर्नर पुढे सरकला. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि रन आऊट होणार तोच मागे फिरला आणि त्याने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. 


वॉर्नरचा घाई गडबडीत घेतलेला तो निर्णय चुकीचा ठरला असता पण थोडक्यात नशीब बलवत्तर म्हणून तो रन आऊट होता होता वाचला. वॉर्नरच्या हातून बॅट सुटली आणि ती पुढे गेली. फिल्डर हमीदजवळ आऊट करण्याची संधी होती. मात्र इंग्लंड टीमनं ती संधी गमवली. 



याआधीही वॉर्नरला त्याच्य़ा नशिबाने साथ दिली. 14व्या ओवरमध्ये बेन स्टोक्सचा बॉल वॉर्नरच्या पॅडला लागला आणि स्टंपला लागला, पण तो नो-बॉल होता. गोलंदाजी करताना स्टोक्सचा पाय क्रीजच्या बाहेर गेला होता, त्यामुळे वॉर्नर बचावला.


डेव्हिड वॉर्नरने 3 वेळा वाचल्याचा फायदा घेऊन 94 धावांची खेळी खेळली. वॉर्नरचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले, पण ट्रॅव्हिस हेडने नाबाद शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मदत केली.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात त्याने सात बाद 343 धावा केल्या आणि 196 धावांची मोठी आघाडी घेतली. यापूर्वी इंग्लंडपहिल्या डावात अवघ्या 147 धावा झाल्या.