Washington Sundar released from squad : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG 5th Test) सामन्यासाठी टीम इंडियाच्या स्कॉडची घोषणा केली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा पाचव्या कसोटीला देखील मुकणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तर दुसरीकडे संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला (Jasprite bumrah) रांची कसोटीत विश्रांती दिली होती. त्याचं आता संघात पुनरागमन झालंय. त्याचबरोबर टीम इंडियाचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सुंदरला टीम इंडियामधून डावलण्यात आल्याने आता कॅप्टन रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटवर टीका होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉशिंग्टन सुंदरला पाचव्या सामन्याआधी संघातून मुक्त करण्यात आलं आहे. 2 मार्च 2024 पासून  मुंबई विरुद्ध होणाऱ्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलसाठी वॉशिंग्टन आपल्या तामिळनाडू संघातून खेळणार आहे. तर गरज भासल्यास पाचव्या कसोटीसाठी देशांतर्गत सामना पूर्ण झाल्यानंतर तो भारतीय संघात सामील होईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे पुनरागमनाचं गाजर दाखवून सुंदरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला का? असा प्रश्न विचारला जात आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियामधून रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांना संघातून बाहेर जावं लागलं. त्यानंतर टीम इंडियामध्ये सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली होती. मात्र, वॉशिंग्टन सुंदरला नुसतीच संधी देण्यात आली. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मालिका विजयानंतर सुंदर पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.


पाचव्या सामन्यासाठी टीम इंडिया


 रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.