...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच `वंदे मातरम्...` गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: बंगळुरूमधील ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर पार पडलेला सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचा अंतिम (SAFF Championship Final) सामना भारतीय संघाने (Indian Football Team) जिंकला. या विजयासहीत भारताने 9 व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. अतिशय रंजक अशा सामन्यामध्ये निर्धारित 90 मिनिटांचा खेळ आणि त्यानंतरच्या 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळात दोन्ही संघांना 1-1 ची बरोबर फोडता न आल्याने पेनल्टी शूटआऊटने या सामन्याचा निकाल लागला. भारतीय संघाने कुवेतच्या संघाला 5-4 ने पराभूत केलं. या विजयानंतर सामन्यपणे क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळणारं अनोखं दृष्य बंगळुरूमध्ये पाहयला मिळालं.
प्रचंड गर्दी आणि उत्साह
फुटबॉलची प्रचंड क्रेझ असलेल्या भारतामधील काही मोजक्या शहरांमध्ये बंगळुरूचं नाव आवर्जून घेतलं जातं. याचाच प्रत्यय मंगळवारच्या सामन्यात आला. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या फुटबॉलप्रेमींनी श्री कांतीरवा स्टेडियम खचाखच भरलं होतं. खेळाडूंनीही चाहत्यांची निराशा केली नाही. अगदी नेल बायटींग फिनिश म्हणावी तसा हा 120 मिनिटांपेक्षा अधिकचा खेळ मैदानात झाला. भारताने विजयी पताका झळकावल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मैदानामध्ये 25 हजार चाहते उपस्थित असल्याचं सांगितलं जातं.
'वंदे मातरम्... माँ तुझे सलाम'चे सूर जुळले
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर भारतीय चाहत्यांनी एकाच वेळी संगितकार ए. आर. रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये चाहते गातात त्याप्रमाणे एका सुरात 'वंदे मातरम्' गाण्यास सुरुवात केली. हजारो चाहते एकाच वेळी हे गाणं गात असल्याने अनेकांच्या अंगावर काटा आला. 'वंदे मातरम्... माँ तुझे सलाम' हे शब्द हजारो चाहत्यांच्या तोंडून एकाच वेळी ऐकू येत असल्याने मैदानावरील वातावरण अगदीच भारावून टाकणारं झालं. एकाच वेळी 25 हजार चाहते 'वंदे मातरम्' गात होते. तुम्हीच पाहा व्हिडीओ...
अगदी शेवटपर्यंत 4-4 ची बरोबरी
सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजेच पहिल्या 45 मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 गोलची बरोबर केली. ही बरोबरी अगदी एक्स्ट्रा टाइममध्येही फोडण्यात दोन्ही संघांना अपयश आलं. पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी अगदी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबर केली होती. मात्र भारतीय संघाचा गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूने चपळता दाखवत कुवैतच्या शेवटचा प्रयत्न हाणून पाडला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं.