मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आपल्या दमदार खेळीच्या बळावर अनेकांची मनं जिंकणाऱ्या आणि नव्या जोमाच्या खेळाडूंसाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या विराट कोहली याने कायमच त्याच्या प्रत्येक कृतीतून इतरांना प्रोत्साहन दिलं आहे. सध्याही त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा एकदा आपल्या शारीरिक सुदृढतेची झलक सर्वांनाच दाखवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर स्वत:च्याच One8 या ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत आहे. pull-ups करतानाचा विराटचा हा व्हिडिओ पाहताना त्याचा अनेकांना हेवाही वाटत असणार यात शंका नाही. 


फक्त क्रिकेटच्या मैदानापुरताच नव्हे, तर विराटने कायमच शारीरिक सुदृढतेला केंद्रस्थानी ठेवलं आहे. आहाराच्या सवयींपासून ते अगदी मांसाहारापासून शाकाराहाकडे वळण्यापर्यंतचा त्याचा प्रयत्न हे सारंकाही दैनंदिन जीनशैलीच्या दृष्टीनेही किती महत्त्वाचं आहे, हे विराटने कायमच त्याच्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहोचवलं आहे. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



आपल्या याच सवयींच्या माध्यमातून तो तरुणाईला अनेक मार्गांनी प्रोत्साहित करत असतो. याचा प्रत्यय येतो विराटच्या एका नव्या इनिंगमधून. क्रिकेट विश्वात नाव कमवणारा विराट हा हॉटेल व्यवसायातही त्याचं नशीब आजमावत आहे. नवी दिल्लीत एका आलिशान हॉटेलमध्ये विराटने त्याच्या आवडीच्या पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश केला आहे. ज्यामध्ये आरोग्यास पूरक आणि तरीही तितकेच चवदार पदार्थ चाखण्याची संधी सर्वांनाच मिळत आहे.