PAK vs SL: बाबर आझमचा `हा` शॉट पाहून पाकिस्तानी चाहते भिडले; पाहा व्हायरल व्हिडीओ..
PAK vs SL: सोशल मीडियावर हा फटका पासून दोन मत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काहींनी याला बाबरचा स्मार्टनेस म्हटलंय तर काहींनी तुक्का लागल्याचं मत व्यक्त केलं आहे.
Babar Azam Unique Boundary During 2nd Test vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये पाकिस्तानचा संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या कसोटीमध्ये पाकिस्तानने विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला चांगली सुरुवात केली आहे. सौद शकीलने केलेल्या दमदार द्विशतकाच्या मदतीने ग्ले येथील मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना 4 गडी राखून जिंकला. या मालिकेमधील दुसरा कसोटी सामना सध्या सुरु असून संपूर्ण 5 दिवसांचा खेळ पावसाच्या अडथळ्याशिवाय झाला तर पाकिस्तान दुसरी कसोटीही जिंकेल अशी चिन्हं दिसत आहेत.
दुसऱ्या कसोटीला दमदार सुरुवात
पाहुण्या पाकिस्तान संघाने यजमान संघाला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 166 धावांवर बाद केलं. त्याच दिवशी पाकिस्तानच्या संघाने वेगवान फलंदाजी करत 9 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानचा संघ 2 बाद 177 वर खेळत होता. कोलंबोमध्ये सुरु असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एक षटकही टाकण्यात आलं नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण खेळ वाया गेला. बुधवारी सामना सुरु झाला तेव्हा पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. पहिल्या दिवशी जिथं खेळ सोडला त्याच जोमाने पाकिस्तानी फलंदाज फटकेबाजी करु लागले.
बाबरचा तो फटका चर्चेत
याच खेळीदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मारलेला एका आगळ्या वेगळ्या फटक्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या फटका पाहून त्याने हा मुद्दा मारला की त्याचा तुक्का लागला यावरुन सध्या पाकिस्तानी चाहत्यांमद्ये चर्चा सुरु आहे. आझमने मारलेल्या या अनोख्या फटक्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. श्रीलंकन वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर बाबरने हा फटका मारला. असिथाने फूल लेंथ आणि ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू बाबर बॅट उंचावून सोडून देणार असं वाटत होतं. मात्र त्याने अचानक मध्येच बॅट घालती आणि चेंडू बॅटची कड घेऊन स्लीप आणि गल्लीच्या गॅपमधून चौकार गेला.
तुम्हीच पाहा आणि ठरवा
बाबरच्या अनेक चाहत्यांनी तो मुद्दाम कोणाला कल्पना येऊ नये म्हणून असा चकवा देणारा फटका मारल्याचा दावा करत आहेत. बाबरचे चाहते त्याचं कौतुक करत असले तरी अनेकांनी चुकून हा तुक्का लागल्याचं हा फटका पाहिल्यानंतर म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय...
कोण काय म्हणालंय?
1) काहीही... त्याने शेवटच्या क्षणी बॅट वर करायचा प्रयत्न केला
2) हा काही नवा शॉट नाही
3) तो गोंधळला
4) तो सराव करायचा
बाबरची कामगिरी आणि टीका
बाबरने पहिल्या कसोटीमध्ये 13 आणि 24 धावांची खेळी केली होती. बाबरच्या फलंदाजीबरोबरच त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. मागील वर्षभरामध्ये पाकिस्तानच्या मैदानावर एकही कसोटी संघाला जिंकता आली नव्हती म्हणून बाबरला लक्ष्य केलं जात होतं. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 0-1 ने पराभूत केलेलं तर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये जाऊन बाबरच्या संघाचा 0-3 ने सुपडा साफ केला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमधून दमदार कामगिरी करत पुनरागम करण्याचा बाबरचा आणि पाकिस्तानी संघाचा विचार आहे.