मुंबई : भारतीय क्रिकेट मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ गेल्या वर्षभर आपांपसातील वादामुळे चर्चेत राहीले. परंतु, यावेळी मात्र हसीन जहाँ वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आलीय हसीन जहाँनं याच वर्षी मार्च महिन्यात मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अत्यंत गंभीर आरोप केले होते. अर्थातच शमीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले. हसीन जहाँनं मोहम्मद शमीवर असाही आरोप केला की ते ईदनंतर दुसऱ्या विवाहाची तयारी करतोय. यावर, असं असेल तर या विवाहात मी हसीनला नक्की बोलावेन, असं मोहम्मद शमीचं म्हणणं होतं. या वादानंतर हसीन आणि मोहम्मद एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. हसीननं शमीकडे आपल्या उदरनिर्वाहासाठी पैशांची मागणी केली होती. परंतु, त्यावरही काही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळेच आता हसीननं आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमी आयुष्यात परत येणार नाही असं दिसल्यानंतर हसीन जहाँनं आपल्या करिअरबद्दल पुन्हा विचार सुरू केलाय. नुकतंच तिनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टही केलीय. 


या व्हिडिओत हसीन जहाँ बोल्ड लूकमध्ये एक फोटोशूट करताना दिसतेय. उल्लेखनीय म्हणजे, मोहम्मद शमीसोबत विवाहापूर्वीही हसीन मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सची चीअरलीडरही होती. 


याआधी, हसीन जहाँनं शमीवर पाकिस्तानी आणि दुबईच्या मुलींशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मॅच फिक्सिंग करून आपल्या फॅन्सची त्यानं फसवणूक केलीय, असा आरोपही तिनं शमीवर केला. या तक्रारी हसीननं कमेटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्स (COA) चे प्रमुख विनोद राय यांना पाठवलेल्या पत्रात केल्या होत्या. परंतु, बीसीसीआयनं शमीला या प्रकरणात क्लीनचीट देऊन टीम इंडियामध्ये सहभागी करून घेतलं.