Rohit Sharma Slams Shardul During 1st WI ODI: बार्बासोडच्या मैदानावर गुरुवारी झालेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना हा स्लो स्कोअरिंग सामना ठरला. भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकीमध्ये वेस्ट इंडिजचा संघ गुंडाळला गेला आणि यजमान संघाला केवळ 114 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र या सामन्यामध्ये फिरकीपटूंनी चेंडू हाती घेण्याआधी भारतीय वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माला मैदानात अगदी शिवीगाळ करावा लागल्याचं पहायला मिळालं. भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरवर रोहित शर्मा चिडल्याचा क्षण कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, पहिल्या डाव्यात म्हणजेच वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरु असताना शार्दुल ठाकूर मिड ऑफला फिल्डींग करत होता. 19 व्या षटकामध्ये शार्दुलकडे बॉल गेला असता तो फारच संथपणे फिल्डींग करताना पाहून रोहितचा पारा चढला. कुलदीप यादवची ही पहिलीच ओव्हर होती. वेस्ट इंडिजचा कर्णधार साही होपने चेंडू मिड ऑफला ढकलला आणि एक धाव घेतली. मात्र दुसरीकडे बॉलवर तुटून पडण्याऐवजी शार्दुलने अगदी संथपणे चेंडू उचलून फेकला. शार्दुलच्या या संथपणामुळे होपने आणखीन एक चोरटी धाव घेतली. 


नक्की वाचा >> Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...'


व्हिडीओ झाला व्हायरल


शार्दुलची फिल्डींग आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली एक्स्ट्रा धाव पाहून कर्णधार रोहित फारच चिडला. रोहित त्याच्या जागेवरुन शार्दुलवर ओरडला. बॉलवर तुटून पडण्याची सूचना करत रोहितने मैदानातच शार्दुलला शिवी दिली. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ओव्हरमध्ये कुलदीपने 6 धावा दिल्या. मात्र कुलदीपने पुढील 2 ओव्हर निर्धाव टाकल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एकाने उपहासात्मक पद्धतीने, 'रोहित शार्दुलचं कौतुक करताना' अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केला आहे.



फिरकी गोलंदजांची कमाल


कुलदीप आणि रविंद्र जडेजाच्या फिरकीमुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 114 धावांपर्यंतच मजल मारता आली. किंग्सटन ओव्हलच्या मैदानात झालेल्या या सामन्याने कुलदीपने यजमान संघाचा कर्णधार होप (43 धावा), डॉमनिक डार्केस (3 धावा), यानिक कारिह (3 धावा) आणि जायडन सेल्स (0 धावा) अशा 4 गड्यांना बाद केलं. जडेजानेही 37 धावांच्या मोबदल्यात 3 गड्यांना बाद केलं. या दोघांच्या भन्नाट गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 50 षटकांच्या सामन्यात केवळ 113 धावा करता आल्या. हा वेस्ट इंडिजचा भारताविरुद्धचा दुसरा सर्वात कमी स्कोअर ठरला. 


भारताची आघाडी


3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. कुलदीपने 6 धावांमध्ये 4 विकेट्स आणि जडेजाने 37 धावांमध्ये 3 विकेट्स घेत भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. पहिल्यांदाच भारताच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.