Imam Ul Haq on England players : पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टेस्ट सिरीज (Test Series) सुरु आहे. सुरुवातीचे 2 सामने इंग्लंडने जिंकले असून सिरीजमध्ये 2-0 (England Win Test Series) अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सिरीजच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानसमोर डोंगऱ्या एवढ्या रन्संचं आव्हान ठेवलं होतं. रावळपिंडी टेस्टमध्ये (PAK vs ENG First Test) पहिल्या इंनिंगमध्ये इंग्रजी खेळाडूंनी तब्बल रन्स केले होते. या रन्ससमोर पाकिस्तानी फलंदाजांची मात्र दाणादाण उडाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ज्यावेळी इंग्लंडच्या टीमने 500 हून अधिक रन्स मारले होते, त्यावेळी पाकिस्तानी खेळाडू निराश झाले होते. याबाबत नुकतंच पाकिस्तानचा ओपनर फलंदाज इमाम उल हक (Imam Ul Haq) ने वक्तव्य केलं आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान त्याने याचा खुलासा केला आहे.


मला त्यांना मारावसं वाटत होतं


प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना पाकिस्तानी फलंदाजाला एक प्रश्न विचारण्यात आला. फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे, तू कोणाला सपोर्ट करतोस? जेव्हा इंग्लंडची टीम सेमीफायनल खेळत होती, तेव्हा तुमची आणि इंग्लंडच्या टीमने सोबत फुटबॉलचा सामना पाहण्याचा विचार नाही का केला?, असा सवाल त्याला केला.


या प्रश्नाचं उत्तर देताना इमाम म्हणाला की, जेव्हा पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी 500 हून अधिक रन्स केले तेव्हा, मला त्यांना मारायचं मन करत होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत फुटबॉलची सामना पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. 



आम्ही फुटबॉल फॅन आहोत, आमच्या टीम्समध्ये रोनाल्डोचे खूप फॅन्स आहेत. त्यामुळे ज्यावेळी त्याचा पराभव झाला, त्यावेळी आम्हाला देखील वाईट वाटलं होतं, असंही इमामने सांगितलं.


पत्रकाराच्या प्रश्नाने खेळाडू कंफ्यूज


दरम्यान इमामला पत्रकाराने एक अजून प्रश्न केला ज्यामुळे तो थोडासा गोंधळलेला दिसला. पत्रकाराने त्याला विचारलं की, रेड बॉल क्रिकेटमध्ये तू खेळतोस, मात्र व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये का सिलेक्ट होत नाही? यावेळी इमामने आपण गोंधळलो असल्याचं सांगितलं. यानंतर पत्रकाराने सरळ पद्धतीने त्याला प्रश्न समजावून सांगितला. 


पत्रकाराच्या या प्रश्नावर इमाम थोडासा संतापल्याचं दिसून आलं. इमामने सांगितलं की, मी वनडेमध्ये सिलेक्ट होत नाहीये, हे तुम्ही मला सांगताय. पाच वर्ष झाली मी सतत क्रिकेट खेळतोय. जर तुम्ही टी-20 म्हणत असाल तर ठीक आहे कारण तिथे मी खेळत नाहीये. ज्या पद्धतीने बाबर आणि रिझवान खेळतायत त्यानुसार, मला नाही वाटतं तिथे कोणा दुसऱ्या ओपनरची गरज आहे. वनडे म्हणत असाल तर मी त्या फॅार्मेटमध्ये खेळतोय.