सेंच्युरिअन : जेपी ड्युमनीच्या नाबाद ६४ रन्स आणि मॅन ऑफ द मॅच क्लासेनच्या ६९ रन्सच्या खेळीमुळे दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. या विजयाबरोबरच तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेनं कमबॅक करत १-१नं बरोबरी केली आहे. भारतानं ठेवलेल्या १८९ रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं ही मॅच सहा विकेट्सनं जिंकली. आता या दोन्ही टीममध्ये तिसरी आणि निर्णायक टी-20 मॅच केप टाऊनला २४ फेब्रुवारीला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं ठेवलेल्या १८९ रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या क्लासेननं ३० बॉल्समध्ये ७ सिक्स आणि ३ फोर मारून ६९ रन्स केल्या. तर ड्युमनीनं ४० बॉल्समध्ये ४ फोर आणि ३ सिक्स मारून नाबाद ६४ रन्स केल्या. भारताचा स्पिनर युजवेंद्र चहलनं ४ ओव्हरमध्ये ६४ रन्स दिल्या.


पराभवानंतर विराट निराश


भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहली निराश दिसला. पण या पराभवाला खेळाडू नाही तर पाऊस जबाबदार असल्याचं कोहली म्हणाला. ही मॅच बॉलर्ससाठी कठीण होती. जेव्हा आमच्या लवकर विकेट गेल्या तेव्हा स्कोअर १७५ रन्सपर्यंत जाईल, असं वाटत होतं. पण धोनी आणि मनिष पांडेच्या फटकेबाजीमुळे आम्ही १९० पर्यंत पोहोचलो, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली.


१२ व्या ओव्हरपर्यंत सगळं व्यवस्थित होतं पण यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे बॉलर्सना बॉलिंग टाकायला अडचणी येत होत्या, अशी कबुली कोहलीनं दिली आहे.