मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ओमारी बँक्सनं क्रिकेट सोडून आता गिटार वाजवून गाणी म्हणतोय. लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर ३१ मे रोजी वेस्ट इंडिज आणि जागितक ११ या टीममध्ये टी-20 मॅच होणार आहे. या मॅचवेळी ओमारी बँक्स त्याचं गायन कौशल्य दाखवेल. ऑफ स्पिनर आणि बॅट्समन असलेला ओमारी बँक्स वेस्ट इंडिजकडून १० टेस्ट आणि ५ वनडे खेळला आहे. चांगल्या कारणासाठी परफॉर्म करायला मिळत असल्याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया बँक्सनं दिली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, शेन वॉटसन आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू मार्क बुचर यांनीही संगीत आणि गायनाचे प्रयत्न केले. वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टली अॅम्ब्रोज आणि रिची रिचर्डसन यांचे तर स्वत:चे बॅण्ड होते. वेस्ट इंडिजचा सध्याचा क्रिकेटपटू ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होचं चॅम्पियन हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरेबियन बेटांवरच्या एंग्लुईलामधलं जेम्स रोलॅण्ड पार्क आणि डोमिनिसियामधलं विंस्डर पार्क स्टेडियमच्या पुनर्निमाणासाठी वेस्ट इंडिज आणि जागितक ११ या टीममध्ये टी-20 मॅच खेळवण्यात येणार आहे.


इंग्लंडचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार इओन मॉर्गनच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही. त्यामुळे मॉर्गनऐवजी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीकडे 'जागतिक ११' या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर मॉर्गनऐवजी इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर सॅम कुर्रेन, लेग स्पिनर आदिल राशिद, फास्ट बॉलर टायमल मिल्सलाही 'जागतिक ११' टीममध्ये निवडण्यात आलं आहे. कुर्रेन या मॅचमधून आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये आगमन करु शकतो. मॉर्गन मिडलसेक्सकडून समरसेटविरुद्ध खेळत असताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.


भारताचे दोन खेळाडू


'जागतिक ११' या टीममध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा विकेट कीपर दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी हे दोघं आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळतील. शमीऐवजी सुरुवातीला हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली होती. पण हार्दिक पांड्याला ताप आल्यामुळे शमीची निवड करण्यात आली.


'जागतिक ११' टीम


शाहिद आफ्रिदी, तमीम इक्बाल, सॅम बिलिंग्स, दिनेश कार्तिक, राशिद खान, संदीप लामिचाने, मिचेल मॅकलेनघन, शोएब मलिक, तिसारा परेरा, ल्यूक रॉन्ची, आदिल रशीद, सॅम कुर्रेन, टायमल मिल्स, मोहम्मद शमी