टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, ज्याची भीती होती तेच झालं; `या` खेळाडूंना संधी
West Indies squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता यजमान वेस्ट इंडिज संघाची घोषणा झाली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल.
West Indies announce T20 World Cup squad : यंदाचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जातोय. अशातच आता यजमान वेस्ट इंडिजच्या संधाची घोषणा झाली आहे. 15 खेळाडूंची निवड वर्ल्ड कपसाठी करण्यात आली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्यावर कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा संघ ग्रुप सी मध्ये असून यामध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या संघांचा समावेश आहे. मात्र, ज्याची सर्वांना अपेक्षा होती, त्या खेळाडूचं नाव टीममध्ये दिसत नाहीये. वेस्ट इंडिजचा (West Indies squad) संघ नेमका कसाय? पाहा
वेस्ट इंडिज संघात ऑलराऊंडर्सला संधी देण्यात आली आहे. रोव्हमन पॉवेल,जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, शाई होप, निकोलस पूरन या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर आंद्रे रसेल, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड अशा स्टार ऑलराऊंडरला संघात स्थान देण्यात आलंय. तसेच अल्झारी जोसेफ, अकेल होसेन, गुडाकेश मोती, रोमॅरियो शेफर्ड, शामर जोसेफ अशा गोलंदाजांना वर्ल्ड कपमध्ये मोठी संधी दिली आहे.
सुनील नारायणचं नाव नाही
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार सलामीवीर फलंदाज सुनील नारायण याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल का? असा सवाल विचारला जात होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुनील नारायणला पुन्हा वेस्ट इंडिज टीमधून खेळवण्यासाठी आम्ही इच्छूक असल्याचं वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोमन पॉवेल याने म्हटलं होतं. त्याला संघात घेण्यासाठी वेस्ट इंडिजकडून फिल्डिंग देखील लावण्यात आली होती. मात्र, अखेर नारायण याने स्पष्ट नकार दिल्याने त्याचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. वेस्ट इंडिजकडे 25 मे पर्यंत संघ बदलण्याची संधी आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ - रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.