WI vs IND 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज (Wi vs Ind 2023) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना फ्लोरिडा येथे खेळवला गेला. वर्ल्ड कपआधी महत्त्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने 85 धावांची वादळी खेळी केली. तर निकोलस पुरनने 47 धावा करत वेस्ट इंडिजला विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन ठेवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने दिलेल्या 166 धावांचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. अर्शदीप सिंहने कायली मेयर्सला तंबुत पाठवल्यानंतर निकोलस पूरनने आतिषबाजी सुरू केली. किंग आणि निकोलस पूरनने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 61 धावा खेचल्या. त्यानंतर निकोलस पुरन आणि ब्रँडन किंग यांनी विकेट सांभाळून ठेवत वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला. भारतीय गोलंदाज फेल ठरल्याचं पहायला मिळालं. तिलक वर्मा आणि अर्शदीपला 1-1 विकेट मिळाली.


टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मागील सामन्यात धमाका करणारे दोन्ही सलामीवीर या सामन्यात फेल गेले आक्रमक सुरूवात करण्याच्या उद्देशाने मैदानात आलेल्या शुभमन गिलने 9 रन तर यशस्वी जयस्वालने 5 धावा करत बाद झाला. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी संयम दाखवत टीमला सांभाळलं. काही वेळातच सूर्याने घेर बदलले. सूर्याने आक्रमण सुरू केलं. तर दुसरीकडे तिलक वर्माने देखील मोलाची साथ देत 27 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांना मैदानात धाव धरता आला नाही. अक्षरने अखेरच्या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 11 व्या क्रमांकावर आलेल्या मुकेश कुमारने पहिल्याच बॉलवर चौकार खेचत 4 धावा केल्या आणि टीम इंडियाने 165 धावा उभ्या केल्या. 


आणखी वाचा - आता तरी देवा मला पावशील का? वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनला; पाहा Video


दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतीय संघ आयलँड दौऱ्यावर असेल. त्यावेळी तीन टी-ट्वेंटी सामने खेळणार जातील. पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल तर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 23 ऑगस्टला असणार आहे. 


आयर्लंड विरुद्ध vs इंडिया | टी 20 मालिकेचं वेळापत्रक (India vs Ireland Time table)


आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.


आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.


आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.


आर्यलँड दौऱ्यासाठी टी-ट्वेंटी संघ: 


जसप्रीत बुमराह (C), ऋतुराज गायकवाड (VC), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (WC), जितेश शर्मा (WC),  शिवम दुबे, डब्ल्यू सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.