फोर्ट लॉडरडेल, (फ्लोरिडा) : भारताच्या विरुद्ध वेस्टइंडीजला ३ सामन्यांची टी ट्वेन्टी मालिका खेळायची आहे. ज्यातील पहिले २ सामने अमेरिकेत खेळले जातील. या मालिकेसंबंधी बोलताना वेस्ट इंडीज क्रिकेट टीमचे कोच फ्लायड रिफरने म्हटलं आहे, कॅरेबियन टीममध्ये किरॉन पोलार्ड आणि सुनील नरेन हे परतले आहेत आणि या दोन्ही खेळाडूंमुळे मालिका खूपच रोमांचक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे आम्हाला विश्वास आहे की, कॅरेबियन टीम या मालिकेत टीम इंडियाला मोठं आव्हान देणार आहे. वेस्ट इंडीज टीम आणि टीम इंडिया पहिल्या २ सामन्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडात पोहचली आहे.


कोच फ्लायड रिफरने म्हटलंय, वेस्ट इंडीजची टीम एक अनुभवी आणि युवा खेळाडूंचं शानदार मिश्रण आहे. क्रिकेट फॅन्ससाठी दोन्ही टीममध्ये होणारा सामना शानदार असणार आहे आणि यात दर्शकांना क्रिकेटचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.


आमच्या टीममध्ये पुन्हा एकदा पोलार्ड आणि नरेनसारखे शानदार खेळाडू आहेत. टीमचे कॅप्टन कार्लोस ब्रेथवेटजवळ क्रिकेटच्या या स्वरूपासाठी खेळण्याचा एक शानदार अनुभव आहे. पियरे सारखा युवा स्पिनर आमच्याकडे आहे, ज्याला मागील वर्षी भारतात खेळण्याचा अनुभव आहे. 


तर एंथली ब्रेंबल फर्स्ट क्लास क्रिकेटसाठी ओळखला जातो, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चांगलं प्रदर्शन करण्यासाठी तो उत्साही आहे.


भारत आणि वेस्ट इंडीज टीममध्ये आतापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले गेले आहेत, यात दोन्ही संघांनी पाच पाच सामने जिंकले आहेत. यातील एक सामना अनिर्णित राहिला.