मुंबई : वेस्ट इंडिजचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. शुक्रवारी (27 नोव्हेंबर) दोन्ही देशांमधये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 180 धावा केल्या. पावसामुळे न्यूझीलंडला 16 ओव्हरमध्ये 176 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. 15.5 ओव्हरमध्ये 179 रन केले. 5 विकेट गमवून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजची फलंदाजीची चांगली सुरुवात होती. फ्लेचर आणि ब्रँडन किंग यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. यानंतर या स्कोअरवर संघाला पाच धक्के बसले. 5.1 षटकांत निकोलस पूरनच्या रूपात संघाला पाचवा धक्का बसला, त्यानंतर कर्णधार किरोन पोलार्डने संघाला अडचणीतून बाहेर काढले. शानदार फलंदाजी करत त्याने अवघ्या 37 बॉलमध्ये 75 धावांची नाबाद खेळी खेळली. या भक्कम डावामुळे वेस्ट इंडिजने 7 विकेट गमवत 180 धावा केल्या.


1 रनवर 5 विकेट


फ्लेचरच्या रुपात वेस्ट इंडिजची पहिली विकेट 58 धावांवर गेली. लकी फर्ग्युसनने 34 धावांवर त्याला बोल्ड केले. यानंतर शिमरॉन हेटमायर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर खाते न उघडता परतला. ब्रँडन किंगच्या रुपात 58 धावांवर संघाची तिसरी विकेट पडली. यानंतर रॉवमॅन पॉवेलची 58 रनवर विकेट पडली. त्यानंतर 59 रनच्या स्कोरवर निकोलस पूरण बाद झाला. वेस्ट इंडिजने 1 रनसाठी तब्बल 5 विकेट गमावल्या.