माऊंट मांगनुई : मागचा अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज यंदा टुर्नामेंटच्या बाहेर गेली आहे. कठीण ग्रुपमध्ये असल्यामुळे वेस्ट इंडिज लवकर स्पर्धेबाहेर जाईल, असं बोललं जात होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या अभ्यास मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं पपुआ न्यूगिनीचा सात विकेट्सनं पराभव केला होता. पहिले बॉलिंग करून वेस्ट इंडिजनं पपुआ न्यूगिनीला १०५ रन्सवर ऑल आऊट केलं. त्यानंतर २२ ओव्हरमध्येच वेस्ट इंडिजचा विजय झाला. दुसरी अभ्यास मॅच पावसामुळए रद्द करावी लागली होती.


वेस्ट इंडिज यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि केनियासोबत ग्रुप एमध्ये होती. नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी टीमला ग्रुपच्या टॉप २ टीममध्ये जागा बनवायची होती. म्हणजेच टीमला तीनपैकी दोन मॅच जिंकाव्या लागणार होत्या.


वेस्ट इंडिजची पहिली मॅच न्यूझीलंडसोबत होती. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं पहिले बॅटिंग करून ५० ओव्हरमध्ये २३३ रन्स केले. सिमंसनं नाबाद ९२ आणि किमानी मेलसनं ७८ रन्स केल्या. या दोघांनी १२३ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. यानंतर कीवी टीमच्या शानदार बॉलिंगपुढे विंडीज संघानं लोटांगण घातलं. मॅथ्यू फिशरनं ६१ रन्स देऊन तर रचिन रविंद्रनं ३० रन्स देऊन ३-३ विकेट घेतल्या. न्यूझीलंडनं २३४ रन्सचं लक्ष्य ४० ओव्हरमध्येच पूर्ण केलं. फिन ऍलनं १०० बॉल्समध्ये ११५ रन्स आणि जेकब भुलानं ८३ रन्स केल्या.


यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा ७६ रन्सनी पराभव झाला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंग केली. पहिले बॅटिंगला उतरलेल्या आफ्रिकेनं वांदिले माकवेटुच्या नाबाद ९९ रन्सच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २८२ रन्स केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम ४५.३ ओव्हरमध्ये २०६ रन्सवर ऑल आऊट झाली.


वेस्ट इंडिजची पुढची मॅच केनियासोबत होणार आहे. ही मॅच वेस्ट इंडिज जिंकली तरी पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकाच पहिल्या दोन क्रमांकावर राहतील. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पुढचा राऊंड खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.


२०१६ साली बांग्लादेशमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजनं फायनलमध्ये भारताला ५ विकेट्सनं हरवलं. त्यावेळी भारत वर्ल्ड कप जिंकेल असा अंदाज होता पण हा अंदाज वेस्ट इंडिजनं खोटा ठरवला. तशी कामगिरी यंदा मात्र वेस्ट इंडिजला करता आली नाही.