पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येही पावसाचा खेळ सुरु आहे. यामुळे ही मॅच ४३ ओव्हरची होणार आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पहिली वनडे पावसामुळे होऊ शकली नाही. या सामन्यात भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना ३९.२ षटके खेळता आली. यात सलामीवीरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिखर धवनने ८७ धावांची खेळी केली तर सलामीवीर अजिंक्य रहाणेने ६२ धावा ठोकल्या. मात्र युवराज सिंगला या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवराजने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ७, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २३, पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात २२ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ४ धावा केल्यात, त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत कोहलीला चिंता आहे. 


भारतीय संघ : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, एम.एस.धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव