...म्हणून ह्युज एडमिड्स ऑक्शन दरम्यान अचानक खाली कोसळले!
ह्यूज एडमीड्स यांना नेमकं काय झालं होतं याच कारण आता समोर आलं आहे.
बंगळुरु : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठीचा मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) सुरु असून आज दुसरा दिवस आहे. काल या लिलावादरम्यान मोठी घटना घडली आहे. या मेगा ऑक्शनचे ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (Auctioneer Hugh Edmeades) कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध होऊन खाली पडले. यामुळे एकच खळबळ उडाली.
दरम्यान ह्यूज एडमीड्स यांना नेमकं काय झालं होतं याच कारण आता समोर आलं आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.
आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनकॅप्ड आणि कॅप्ड खेळाडूंवर बोली सुरू असताना ह्यूज एडमीड्स अचानक खाली कोसळले. आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट्चरल हायपोटेन्शनमुळे (Postural Hypotension) खाली कोसळले होते.
पोस्ट्चरल हायपोटेन्शन म्हणजे रक्तदाबात वेगाने कमी होते. जेव्हा तुम्ही बराच वेळ बसलेले असता आणि अचानक उभे राहून काही काम करण्यास सुरुवात करता तेव्हा असं होऊ शकतं.
श्रीलंकेचा गोलंदाज वनिंदु हसरंगा याच्यावर बोली सुरु होती. हसरंगावर 10 कोटी 75 लाख रुपयांवर ही बोली पोहचली होती. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे लंच ब्रेक घेऊन हा लिलाव काही वेळेसाठी थांबवण्यात आला होता.