IPL 2023: गोल्डन डक ऐकलंय पण `डायमंड डक` म्हणजे काय? आश्विनही झाला शिकार
What is diamond duck? आर आश्विनला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. सामन्यातील राजस्थानच्या 8 व्या ओव्हरवेळी ही घटना घडली. तो शुन्यावर बाद झाला. तो डायमंड डकवर बाद झाला.
IPL 2023, R Ashwin Out On Diamond Duck: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात आयपीएल 2023 चा 60 वा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याने प्लेऑफ्सचं (IPL Playoffs) गणित बिघडलं आहे. जयपूर येथे झालेल्या या सामन्यात बंगळुरूने राजस्थानवर एकतर्फी विजय नोंदवला आणि राजस्थानचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. आरसीबीचं हे आव्हान राजस्थान सहज पूर्ण करेल, अशी शक्यता होती. 172 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या राजस्थानचा संघ 10.3 षटकांत अवघ्या 59 धावांत गारद झाला.
यंदाच्या आयपीएल हंगामातील राजस्थानचा (rajasthan royals) हा लाजीरवाणा पराभव होता. सलामीवीर फलंदाज झटपट बाद झाल्याने उर्वरित फलंदाज झटपट बाद झाले. कॅप्टन सॅमसनसह सर्व फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही. विकेट्स जात असताना संयमी खेळी करण्याची गरज होती. मात्र, फलंदाजांनी आक्रमण करत विकेट्स गमावल्या. यात सर्वात जास्त चर्चेत राहिली ती आश्विनची विकेट.
आर आश्विनला या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. सामन्यातील राजस्थानच्या 8 व्या ओव्हरवेळी ही घटना घडली. तो शुन्यावर बाद झाला. तो डायमंड डकवर बाद झाला, अशी चर्चा सुरू झाली. आता तुम्ही गोल्डन डक (Golden Duck) ऐकलं असेल, पण हे डायमंड डक (Diamond Duck) प्रकरण काय? असा सवाल अनेकांना पडला असेल.
डायमंड डक (Diamond Duck) म्हणजे काय?
जेव्हा एखादा खेळाडू कोणत्याही चेंडूचा सामना न करता नॉन-स्ट्राईकवर उभा असतो आणि धावा घेताना तो शून्यावर धावबाद होतो तेव्हा त्याला डायमंड डक (Diamond Duck) म्हणतात.
आणखी वाचा - T20 World Cup साठी कोण असेल कॅप्टन? Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...
राजस्थानच्या इनिंगवेळी हेटमायर स्ट्राइकवर होता आणि अश्विन नॉन स्ट्राइकवर होता. हेटमायर शेवटचा चेंडू घेण्यासाठी धावत असतानाच अश्विनही धावला, त्यावेळी दोन धाव घेत असताना आश्विनला धाव पूर्ण करता आली नाही आणि तो धावबाद झाला. करण शर्माने केलेल्या थ्रोवर विकेटकिपर गुरबाजने अप्रतिम स्टंप्स उडवले. त्याच्या या कृतीमुळे सर्वांना धोनीची आठवण आली.