मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठी खास ओळखला जातो. पण विराट कोहली एवढा फिटनेस फ्रीक का आहे, हे कुणाला माहित नाहीये. मात्र आता त्याच्या फिटनेसचं रहस्य समोर आलं आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेच हे सिक्रेट सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सहवागने सांगितलंय की, “२०११-१२मध्ये इंग्लंड दौऱ्यावेळी झालेल्या फिटनेस प्रोग्रॅममध्ये सगळे भारतीय खेळाडू फेल झाले. विराट कोहलीही तेव्हा त्या टीममध्ये होता, मात्र फिटनेस अभावी तो मॅच खेळू शकला नाही. कदाचित याच्याच मुळे विराट कोहलीला वाटलं असेल, की खेळण्यासोबत फिटनेसकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.


जर इंग्लंडमध्ये फिटनेसाठी काही नियम आहेत, तर भारतात का नाही? असा विचारही विराटने केलेला असावा, आणि म्हणूनच जेव्हा विराट कर्णधार झाला, तेव्हापासून त्याने या गोष्टीकडे कटाक्षाने जोर दिला, की सगळ्या खेळाडूंना फिटनेस टेस्ट करावी लागेल.”


विराटचं फिटनेस फ्रीक असण्याचं ताज उदाहरण बघायचं झालं तर स्पिनर वरूण चक्रवर्तीचं आहे. वरूण चक्रवर्ती उत्तम गोलंदाज असल्यानं IPL 2020 मध्ये त्याची निवड झालेली, पण फिटनेस टेस्ट पास न झाल्यानं त्याला खेळता आलं नाही.


त्यामुळे आता क्रीकेटमध्ये केवळ गोलंदाजी किंवा फलंदाजी उत्तम असून चालत नाही, तर त्याला फिटनेसचीही जोड असावी लागते. हे सगळं होण्याचं श्रेय निश्चितच विराट कोहलीला जातं. जो स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देतोच. पण एक कर्णधार म्हणून आपली टीमही फिट असायला हवी, यावरही भर देतो.