मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर सर्वाधिक चर्चा ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकच्या निवडीची आहे. दिनेश कार्तिक हा सध्या भारतीय टीममधला सगळ्यात वरिष्ठ खेळाडू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिकचं वय जरी ३३ वर्ष असलं, तरी त्याने सप्टेंबर २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर कार्तिक पहिली वनडे मॅच खेळला. त्यावेळी सौरव गांगुली भारतीय टीमचा कर्णधार होता. सध्याच्या भारतीय टीममधला एकही खेळाडू तेव्हा भारतीय टीममध्ये नव्हता. एवढच नाही तर ३७ वर्षांचा महेंद्रसिंग धोनी तेव्हा रणजी टीममध्येच स्वत:ची जागा बनवू शकला होता.


२००४ साली जेव्हा कार्तिकने पदार्पण केलं तेव्हा तो १९ वर्षांचा होता. त्यावेळी धोनी रणजीमध्ये झारखंड टीमचा हिस्सा होता. धोनीचा भारतीय टीममध्ये प्रवेशही झाला नव्हता.


वर्ल्ड कपच्या टीम निवडीवेळी दिनेश कार्तिकची स्पर्धा ऋषभ पंत याच्याशी होती. जेव्हा कार्तिकने त्याची पहिली मॅच खेळली तेव्हा ऋषभ पंत फक्त ७ वर्षांचा होता. भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली तेव्हा १६ वर्षांचा होता. विराट त्यावेळी अंडर-१६ टीमकडून खेळत होता.



शाळेच्या टीममधला ऋषभ पंत


मागच्या १५ वर्षांपासून भारतीय टीममध्ये असलेला दिनेश कार्तिक २००७ साली भारताच्या वर्ल्ड कप टीमचा हिस्सा होता, पण त्याला एकही मॅच खेळायची संधी मिळाली नाही. यानंतर भारत २०११, २०१५ साली वर्ल्ड कप खेळला, पण कार्तिक त्या टीममध्ये नव्हता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कार्तिकला खेळायची संधी मिळू शकते.


दिनेश कार्तिकने ९१ वनडेमध्ये ३१ च्या सरासरीने १,७३८ रन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये कार्तिकला एकही शतक करता आलेलं नाही. वनडेमध्ये कार्तिकने ९ अर्धशतकं केली आहेत. १५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कार्तिकने २६ टेस्ट मॅचच्या ४२ इनिंगमध्ये ४९ च्या सरासरीने १,०२५ रन केले आहेत.