मुंबई : भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुरलीचा जन्म 1 एप्रिल 1984 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. मुरली विजय हा सध्या भारतीय संघाचा भाग नाही, परंतु काही काळासाठी तो भारतीय कसोटी संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2008 मध्ये  टेस्ट मॅचमधून क्रिकेटच्या जगात पदार्पण करणारा, मुरली विजय भारतासाठी अनेक अविस्मरणीय सामने खेळला आहे. तो टीम इंडियाकडून 17 वन डे मॅच आणि 9 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. हा खेळाडू क्रिकेटमध्ये अधिक यशस्वी झाला असला तरी. विजयचे पूर्वीचे आयुष्य सोपे नव्हते. आई-वडीलांना तर वाटायचे की, हा पुढे शिपाई होईल.


मुरली विजय याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तसे त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल नव्हते, परंतु मुरली विजय अभ्यासात कमकुवत होता. त्याला अभ्यास करायला मुळीच आवडायचे नाही. त्यामुळे तो बारावीत बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला.


नापास झाल्यानंतर मुरली विजय घर सोडून निघून गेला. अपयशामुळे मुरली विजय अस्वस्थ झाला होता. त्याने काही चुकीचे पाऊल उचलू नये, असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. परंतु मुरली विजयचे लक्ष्य काही वेगळेच होते.


तेव्हा मुरली विजयने आई-वडिलांना आश्वासन दिले आणि सांगितले की, "घाबरू नका, मी काही आत्महत्या वैगरे करणार नाही. मला स्वत:ला हवं तसं जगायचं आहे आणि स्वत: ला ओळखायचं आहे."


घर सोडल्यानंतर मुरली विजय मित्रांच्या घरी गेली. अनेक वेळा तो चेन्नई वायएमसीए आणि आयआयटी क्रिकेट मैदानातही झोपला. मुरली विजय क्रिकेट खेळायचा आणि त्याबरोबर तो खर्च भागवण्यासाठी स्नूकर पार्लरमध्ये काम करायचा. टीम इंडियाचे सध्याचे गोलंदाज कोच भरत अरुण यांनी मुरली विजयची प्रतिभा ओळखली.


अरुणने मुरली विजयला चेन्नई क्रिकेट लीग खेळण्यासाठी आमंत्रित केले, जिथे त्याने सर्वांना प्रभावित केले. वयाच्या 21 व्या वर्षी, त्याने तमिळनाडू रणजी संघातून खेळण्यासाठी तयारी करायला सुरुवात केले. परंतु त्याची निवड झाली नाही, कारण त्याचे केस लांब होते.