Wimbledon 2021 | टेनिसची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर दिसणारे अनेक चेहरे कायम प्रकाशझोतात येतात. काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचा पत्नीने दरवर्षप्रमाणेच या टेनिस स्पर्धेत हजेरी लावली होती. यावेळी सचिनपेक्षा अधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे विराट कोहली आणि त्याचसोबत आलेल्या खास व्यक्तीने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेनिसच्या कोर्टवर विराटनं केलेली ही प्रेमाची सर्विस अशी काही दणक्यात लागली की सर्वांनीच त्याची दाद दिली. विराटला यावेळी साथ दिली होती अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं. 


2015 मध्ये हे सारं घडलं होतं. अनुष्का आणि विराट ही जोडी अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अखेर या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. विम्बल्डन 2015 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. टेनिस जगतात अतिशय मनाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये फक्त क्रिकेटपटू नव्हे तर इतरही अनेक क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावतात. त्यामुळे ही स्पर्धाही सातत्याने चर्चेत असते.