मुंबई : टीम इंडियाची सूत्र रोहित शर्माच्या हाती आली त्यानंतर एकापाठोपाठ एक सामने जिंकण्याची सुरुवात झाली. आधी श्रीलंके विरुद्ध टी 20 सीरिज जिंकली. त्यानंतर कसोटी सीरिजमध्ये एका इनिंगमध्ये 222 धावांनी कसोटी सामना जिंकला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माने अनेक नव्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रविंद्र जडेजा द्विशतकाजवळ होता. 175 धावा करून नाबाद राहिला. पंतच शतक 4 धावांसाठी हुकलं तर आर अश्विननं कपिल देव यांचं रेकॉर्ड मोडला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. 


या विजयाचा जल्लोष साजरा करताना रोहित शर्माने अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. रोहित शर्माच्या मते एका सामन्यात 5 विकेट्स काढणारा आणि 175 धावा करणारा जडेजा बेस्ट प्लेअर नाही. रोहितसाठी तो उत्तम आहेच मात्र बेस्ट प्लेअर असं नाही म्हणता येणार. तर बेस्ट प्लेअरच्या यादीत विराट कोहलीलाही रोहितनं स्थान दिलं नाही. 


रोहितच्या मते हा बेस्ट खेळाडू
रोहित शर्माने सांगितलं की आर अश्विनने त्याच्यामते केलेले बदल फार चांगले आहेत. योग्य वेळ आणि काळ या दोन्हीच भान ठेवून त्याने आपल्याला अपडेट केलं आहे. सर्वात महान खेळाडू आणि बेस्ट प्लेअर म्हणून कर्णधार रोहित आर अश्विनकडे पाहातो. अश्विननं कपिल देव यांचा 434 विकेट्सचा विक्रम मोडला आहे. 


नुसती स्वप्न पाहात नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटता ही गोष्ट खूप चांगली आहे. असं म्हणत कर्णधार रोहित शर्मानं आर अश्विनचं कौतुक केलं आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला बघतो तेव्हा तो अधिक चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं प्रत्येकवेळी दिसतं. तो स्वत:च्या क्षमतेवर विश्वास करतो हीच खरी चांगली गोष्ट आहे असंही रोहित शर्मानं यावेळी म्हटलं आहे.