IND vs PAK: स्वत: विराट कोहली म्हणतो `बाबर जगात एक नंबर फलंदाज`, सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा!
Virat Kohli On Babar Azam: विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तसेच, `मला बाबरला खेळताना पाहणं नेहमीच आवडतं`, असंही विराट कोहली म्हणाला.
Virat Kohli Reveals Babar Azam’s First Meeting : जगभरातील मोस्ट स्टायलिश प्लेयर्सच्या (Most Stylish Players) यादीत विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांचं नाव घेतलं जातं. 2019 च्या वर्ल्ड कप सामन्यात दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून बाबर आझमची ओळख भारतात निर्माण झाली. मात्र, आता बाबर मोठा खेळाडू झाला आहे. दोन्ही खेळाडूंचा एकच फेवरेट शॉट, तो म्हणजे कवर ड्राईव्ह. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये कोण भारी? असा सवाल विचारला जातो. त्यावर आता खुद्द किंग कोहलीने उत्तर दिलंय.
विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तसेच, 'मला बाबरला खेळताना पाहणं नेहमीच आवडतं', असंही विराट कोहली म्हणाला. त्यावेळी विराट कोहलीने पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय म्हणाला विराट कोहली?
बाबर आझमसोबत पहिली भेट ही 2019 च्या विश्वचषक सुरू असताना झाली होती. आमचे पहिलं बोलणं मँचेस्टरमध्ये झालेल्या वर्ल्ड कप सामन्यानंतर झालं होतं, असं विराट म्हणतो. मी इमादला अंडर 19 च्या वर्ल्ड कपपासून ओळखत होतो. त्यावेळी इमाद मला म्हणाला की, बाबरला माझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आम्ही भेटलो आणि बसून क्रिकेटबद्दल गप्पा मारल्या, असं विराट कोहली म्हणतो.
बाबर आझमने पहिल्या भेटीत मला खूप सन्मान दिला आणि तो आत्ताही तेवढाच सन्मान देतो. सध्या तो जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. तो सात्त्याने चांगली कामगिरी करतोय. त्याला खेळताना पाहताना मला आनंद होतो, असं म्हणत विराट कोहलीने भारतीयांचं तसेच पाकिस्तानचं देखील मन जिंकलंय.
पाहा Video
दरम्यान, विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 501 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर बाबर आझमने आतापर्यंत 253 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विराटच्या आंतरराष्ट्रीय 25582 धावांसमोर बाबर आझमच्या 12346 धावा म्हणजे किरकोळ. पण येत्या काळात बाबर जगातील नंबर 1 फलंदाज होईल, असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. शोएब अख्तरने विराटला देवाची उपमा दिली होती. विराट इज गॉड, असं म्हणत शोएब विराटच्या फलंदाजीबद्दल त्याचं कौतूक केलं होतं.