Sarfaraz Khan Wife: कोण आहे सरफराज खानची पत्नी? बुरखा न घातलेले फोटो व्हायरल
Sarfaraz Khan Wife: सरफराज खानला (Sarfaraz Khan) अखेर इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. सरफराजला मैदानात पाहिल्यानंतर त्याचे वडील आणि पत्नी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
Sarfaraz Khan Wife: रणजी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) अखेर संधी मिळाली आहे. राजकोट (Rajkot) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानला संघात समाविष्ट करण्यात आलं असून आज तो पहिला कसोटी सामना खेळला. माजी भारतीय क्रिकेटर अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) हस्ते सरफराज खानला टोपी देण्यात आली. यावेळी त्याचे वडील आणि पत्नी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
सरफराज खान भारताचा 311 वा कसोटी खेळाडू ठरला आहे. सरफारजच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी त्याचे वडील नौशाद खान (Naushad Khan) आणि पत्नी रोमाना जहूर (Romana Zahoor) राजकोटमध्ये पोहोचले होते. रोमाना यावेळी मैदानात बुरख्यात होती. मात्र तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकजण तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरफराज खानचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमाना मैदानात फारच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नौशाद खान यांनी मुलाची गळाभेट घेत, त्याला मिळालेल्या टोपीचं चुबन घेतलं आणि आपल्याला किती अभिमान वाटत आहे हे दाखवलं. यावेळी रोमाना जहूरलाही अश्रू आवरत नव्हते. सरफराजने तिचीही गळाभेट घेतले आणि डोळे पुसले. त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोण आहे सरफराजची पत्नी रोमाना जहूर?
रोमाना जहूर ही जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याची रहिवासी आहे. रोमाना बीएससीची विद्यार्थिनी आहे. काही रिपोर्टनुसार, रोमाना जहूर ही सरफराजच्या चुलत भावाची मैत्रीण आहे.
सरफराज खानने पहिल्याच भेटीत रोमाना जहूरला पसंत केलं होतं. एकदा रोमाना सरफराजच्या भावासह सामना पाहण्यासाठी आली होती. त्याचवेळी दोघांची भेट झाली होती. तेव्हाच त्याने तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. रोमानाच्या कुटुंबाने सरफराजच्या कुटुंबाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंब लग्नासाठी लगेच तयार झाले होते.
सरफराज खान आणि रोमाना जहूर यांचा निकाह 6 ऑगस्ट 2023 मध्ये झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावर उमरान मलिक, सूर्यकुमार यादव आणि इतर भारतीय खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या होत्या.
सरफराज खान आणि रोमाना जहूर यांचा निकाह काश्मीरमध्ये झाला होता. आपण लग्न काश्मीर खोऱ्यात झाल्याचा सरफराजला प्रचंड आनंद झाला होता. त्याने म्हटलं होतं की, "माझं लग्न काश्मीरमध्ये होणार याचा निर्णय देवाने आधीच केला होता. हे माझ्या नशिबातच होतं. मला येथे फार प्रेम मिळालं असून, जेव्हा कधी वेळ तेव्हा येथे येईन"