मुंबई : रोहित शर्माला (Rohit Sharma) स्वत:ला कर्णधार (Captaincy) म्हणून सिद्ध करण्याची शेवटची संधी फक्त ही आगामी 2022 च्या T20 (T 20 World Cup 2022) आणि 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (World Cuo 2023) आहे.  रोहितचं  2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर वय हे 36-37 वर्षे इतकं असेल.  त्यामुळे रोहितला कर्णधारपदावरुन पायऊतार व्हाव लागू शकतं. टीम इंडियात असा एक खेळाडू आहे जो  2023 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माच्या जागी कसोटी, एकदिवसीय आणि T20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन होऊ शकतो. (who is team india next captain after rohit sharma hrdik pandya is big contetor)


रोहितनंतर पुढचा कॅप्टन कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्या  2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर  टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.  हार्दिकने टीम इंडियासाठी गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिकमध्ये नेतृत्व क्षमता आहे. निर्णायक क्षणी टीमला विजय मिळवणू देण्याची क्षमता त्याच्यात आहे. कॅप्टन होण्यासाठी आवश्यक ते गुण हार्दिकमध्ये आहेत. हार्दिकने कर्णधारपदाच्या पदार्पणातच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला IPL 2022 ची ट्रॉफी जिंकून दिली.


हार्दिक आशिया कपपासून (Asia Cup 2022) ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपर्यंत (Ind vs Aus T 20 Series 2022) पंड्याने जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली. हार्दिकही जोरदार फिल्डिंगही करतोय.  हार्दिकची तुलना आतापर्यंत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी करण्यात आली आहे. जर हार्दिक टीम इंडियाचा कर्णधार झाला तर तो कपिल देव यांच्यासारखा हिट ठरु शकतो.


हार्दिकमध्ये धोनीची झलक


हार्दिक 140 किमी वेगाने बॉलिंग करतो. हार्दिकने आतापर्यंत टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या.  हार्दिकने जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यांचे नेतृत्व केलं.  टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले आहेत.