फोटोमध्ये असलेला तो व्यक्ती कोण? Suryakumar Yadav ने पोस्ट केलेल्या फोटोवरून चर्चा
सूर्यकुमार यादवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे.
पर्थ : येत्या 16 ऑक्टोंबरपासून ऑस्ट्रेलियात (Australia) टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी अनेक टीम्स ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या आहेत. आज टीम इंडियाचा (Team India) सराव सामना देखील पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने चांगलाच दमखम दाखवून वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. दरम्यान यावेळी सूर्यकुमार यादवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे.
दरम्यान सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेला फोटो चाहत्यांना खूप आवडलाय. मात्र या चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. या फोटोत त्याच्यासोबत रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल दिसतायत. पण त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती या फोटोमध्ये दिसतोय. हा व्यक्ती कोण हा सवाल अनेकांना आहे.
फोटोमध्ये असलेला तो व्यक्ती कोण?
या फोटोमध्ये डाव्या बाजूला असलेला व्यक्ती सोहम देसाई आहे. सोहम हे क्रिकेट टीम इंडियाचे कोच आहेत. सोहम strength and conditioning coach आहेत. ते इंडियन क्रिकेट टीमच्या सपोर्ट स्टाफमधील एक आहेत.
सराव सामन्यात टीम इंडियाचा विजय
टीम इंडियाने (Team India) पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 रन्सने पराभव केला. भारताकडून सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी चमकदार कामगिरी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने विजयी सुरुवात केली.