मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला येत्या ३० मे पासून सुरुवात होत आहे. क्रिकेट रसिकांना वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्टइंडिजच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असणार आहे. विस्फोटक खेळाडू ख्रिस गेलचा हा ५ वा वर्ल्डकप आहे. असे असूनही त्याला एकदाही वर्ल्डकप जिंकण्याचं भाग्य लाभले नाही. सर्वाधिक वेळा वर्ल्डकप खेळून वर्ल्डकप जिंकता न आलेला गेल हा एकमेव खेळाडू नाही. गेल सारखे असे आणखी खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ५ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ल्डकप खेळून देखील त्यांना वर्ल्डकप उंचावता आला नाही.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल पाचव्यांदा वर्ल्डकप खेळतो आहे. गेलने वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेण्याची घोषणा याआधीच केली आहे. त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकून गेलला आंनदी रित्या निरोप देण्याचा प्रयत्न वेस्टइंडिजचा असेल. जर वेस्ट इंडिजचा पराभव झाला तर, गेलच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड होईल. हा रेकॉर्डची नोंद याआधीच काही खेळाडूंच्या नावे आहे.

काय आहे रेकॉर्ड

गेलच्या आधी स्टीव्ह टिकोलो, थॉमस ओडोयो, ब्रायन लारा, शिवनरीन चंद्रपॉल, महेला जयवर्धने, जॅक कॅलिस, डॅनिएल व्हिटोरी, शाहिद आफ्रिदी या खेळाडूंनी ५ वेळा वर्ल्ड कप स्पर्धा खेळले आहेत. यांना एकदाही वर्ल्डकप जिंकता आला नाही.

गेलने वनडे क्रिकेटमध्ये १९९९ साली पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत गेल २००३ ते २०१५ दरम्यान झालेल्या एकूण ४ वर्ल्डकप स्पर्धा खेळला आहे. जर या वर्ल्डकपमध्ये वेस्टइंडिजचा पराभव झाला तर गेलचा या अपयशी खेळाडूंच्या यादीत समावेश होईल. सचिन तेंडुलकर देखील ५ वर्ल्डकप स्पर्धा खेळला आहे. २०११ ची वर्ल्डकप हा सचिनचा ५ वा वर्ल्डकप होता. भारताने हा वर्ल्डकप जिकंला होता.