BCCI Meeting : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह आता आयसीसीचे चेअरमन बनले आहेत. 1 डिसेंबर पासून जय शाह आयसीसीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहेत. तेव्हा आता बीसीसीआय नव्या सचिवांच्या शोधात असून सचिव पदी व्यक्तीला नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेव्हा बीसीसीआयच्या सचिव पदासाठी उत्सुक असणारी काही नाव समोर आली आहेत. 


बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयची 93 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक रविवारी पार पडली. यात सदस्यांनी जय शाहला विनंती केली की त्यांनी नवीन सचिव शोधण्याच्या कामात गती आणवी. तरी या बैठकीचा मुख्य मुद्दा हा नव्हता, परंतु सदस्यांनी याविषयावर खुलेपणाने चर्चा केल्याची माहिती शाह यांनी दिली. जय शाह नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत या पदावर राहतील. जय शाह हे एशियन क्रिकेट काउंसिलचे सुद्धा प्रमुख आहेत, त्यामुळे आयसीसीचे चेअरमनपद मिळाल्यावर त्यांना हे पद सुद्धा सोडावे लागेल. त्यांच्या जागी एशियन क्रिकेट काउंसिलचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्वी होऊ शकता. सध्या ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. 


हेही वाचा : श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स


 


ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टच्यानुसार दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष रोहन जेटली, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशीष शेलार, संयुक्त सचिव देवजीत सैकिया आणि गुजरात क्रिकेट संघचे सचिव अनिल पटेल बीसीसीआयच्या सचिव पदासाठी प्रमुख दावेदार आहेत.  बीसीसीआयने आयोजित एजीएमचे आणखीन एक प्राधान्य होते की आयसीसीच्या बैठकींमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील दोन प्रतिनिधींचे नामांकन ठरवणे. अरुण धुमाळ आणि अभिषेक दालमिया यांची आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलमध्ये जनरल बॉडी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. धुमाळ किमान आयपीएल 2025 पर्यंत लीगचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील.


वार्षिक बजेटला मिळाली मंजुरी : 


आंध्र प्रदेशचे माजी क्रिकेटर वी चामुंडेश्वरनाथ यांना भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनने एक खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्यांना यापूर्वी आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलमध्ये सामील करण्यात आले होते. एजीएम ने 2024-25 सीजनच्या वार्षिक बजेटला मंजुरी दिली आणि सदस्यांनी एक सोसायटी म्हणून बीसीसीआयचा कायदेशीर दर्जा कायम ठेवण्याचा एकमताने ठराव केला.