IPL 2022 Final : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) चा विजेतेपदाचा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. काही तासांतच हार्दिक पांड्या किंवा संजू सॅमसन यांच्यामध्ये आयपीएल 2022 ची ट्रॉफी कोण उचलणार हे निश्चित होईल. गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी जिंकली. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने पहिला क्वालिफायर सामना गमावल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत कोणत्या संघाचे पारडे जड असू शकते आणि जेतेपदावर ते आपले नाव कोरतील असा अंदाज टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.


स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान रैना म्हणाला की, "मला वाटते की गुजरात टायटन्स संघ राजस्थान रॉयल्सपेक्षा थोडा चांगला आहे कारण त्यांना अंतिम सामन्यापूर्वी चार-पाच दिवसांची विश्रांती मिळाली आहे आणि त्याशिवाय त्यांनी संपूर्ण हंगाम खेळला आहे.


तो पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की राजस्थान रॉयल्सला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही कारण संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि जोस बटलरच्या बॅटने पुन्हा एकदा फटकेबाजी केली तर तो संघासाठी एक मोठा बोनस पॉइंट असेल. हा एक उत्तम सामना असू शकतो. याशिवाय अहमदाबादची विकेटही चांगली आहे, दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आम्ही चांगले फटके पाहिले'