FIFA World Cup 2022 Argentina Vs France: फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहेत. रविवारी (Sunday) फीफा वर्ल्डकपची (FIFA World cup 2022) फायनल रंगणार आहे. अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स असा हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाकडून लियोनेल मेस्सीकडे तर फ्रान्सकडून कायलियन एम्बाप्पे याच्याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहितीये का? अर्जेंटीना किंवा फ्रान्स या दोघांपैकी कोणत्याही टीमने वर्ल्डकप जिंकला तरीही यंदाचा वर्ल्डकप एकाच टीमकडे जाणार आहे. तुम्हाला हे वाचून थोडं विचित्र वाटेल मात्र, होय, हे खरं आहे.


या टीमकडे जाणार वर्ल्डकप


फुटबॉलचे अनेक खेळाडू हे क्लबतर्फे देखील खेळतात. अर्जेंटीना लिओनेल मेस्सी हा Paris Saint-Germain F.C या टीमकडून खेळतो. तर फ्रान्सचा एम्बाप्पे देखील याच टीमकडून खेळतो. त्यामुळे दोन्ही खेळाडूंकडून कोणीही वर्ल्डकप जिंकलं तर पॅरीसकडे वर्ल्डकप जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे उद्याची फायनल मेस्सी किंवा एम्बाप्प, दोघांपैकी कोणीही जिंकली तर पॅरीसच्या चाहत्यांना आनंद होणार आहे.


अर्जेंटीनाचा फायनलपर्यंतचा प्रवास


साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं.


सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला.


फ्रान्सच्या टीमचा आतापर्यंत प्रवास


साखळी फेरीत फ्रान्सनं विजयी सलामी देत ऑस्ट्रेलियाचा 4-1 पराभव केला. त्यानंतर डेन्मार्कला 2-1 ने पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात टुनिसियाकडून 1-0 पराभव सहन करावा लागला. मात्र फ्रान्स बाद फेरीतील सुपर 16 फेरीत स्थान निश्चित केलं होतं. सुपर 16 फेरीत फ्रान्सनं पोलंडचा 3-1 ने धुव्वा उडवला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत उपांत्य फेरीत धडक मारली. 


डार्क हॉर्स म्हणून चर्चा असलेल्या मोरोक्कोशी उपांत्य फेरीत गाठ पडली. उपांत्य फेीरत फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सनं 2018 चा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. वर्ल्डकप 2018 मध्ये सुपर 16 मध्ये फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 नं पराभव केला होता.