BCCI Central Contract : बीसीसीआयने नुकताच सेंट्रल कॉन्ट्राक्ट जाहीर केला. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहेत. 'ग्रेड ए प्लस'मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. तर दुखापतीमधून सतत बाहेर असणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) 'ग्रेड ए'मध्ये सामील करण्यात आलंय. तर बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोन्ही खेळाडूंना करारातून वगळण्यात आलंय. त्यानंतर क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. अशातच टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने बीसीसीआयचे कान टोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला इरफान पठाण?


श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे दोघंही अत्यंत प्रतिभावान आणि हुशार खेळाडू आहेत. मला विश्वास आहे की, दोघंही पुन्हा पुनरागमन करतील. हार्दिक पांड्यासारख्या इतर खेळाडूंना जर कसोटी क्रिकेट खेळायचं नसेल तर टीम इंडियासाठी खेळत नसताना इतर देशांतर्गत क्रिकेटमधील व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर बीसीसीआयचे हे नियम सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही, असं म्हणत इरफान पठाणने बीसीसीआयचे कान टोचले आहेत.



दरम्यान, गेल्या 6 वर्षापासून हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमधून दांडी मारताना दिसतोय. त्याचबरोबर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग देखील नोंदवत नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या बीसीसीआयचा जावाई आहे का? असा सवाल सोशल मीडियावर नेटकरी उपस्थित करत आहेत. अशातच आता क्रिडादिग्गज देखील यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिकबाबत कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.


ग्रेड A+: 7 कोटी
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.


ग्रेड A: 5 कोटी
आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.


ग्रेड B: 3 कोटी
सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.


ग्रेड C : १ कोटी
रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.