GT vs SRH: गुजरात टायटन्सने बदलला जर्सीचा रंग; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!
Why are GT wearing a Lavender Jersey: आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) एका वेगळ्याच जर्सीमध्ये खेळताना दिसतेय. लव्हेंडर कलरच्या (lavender jersey) जर्सीमध्ये गुजरातचा संघ मैदानात उतरलाय. त्याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया..
Gujarat Titans lavender jersey: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील खेळवला जातोय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. हैदराबादला पराभूत करून आयपीएलच्या प्लेऑफमधील (IPL Playoffs) स्थान निश्चित करण्याची संधी गुजरातकडे आहे. त्यामुळे आता गुजरातच्या (Gujarat Titans) कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता या सामन्यात गुजरात टायटन्स एका वेगळ्याच जर्सीमध्ये खेळताना दिसतेय. लव्हेंडर कलरच्या (lavender jersey) जर्सीमध्ये गुजरातचा संघ मैदानात उतरलाय. त्याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया..
गुजरातचा सामना पाहण्यासाठी ज्यावेळी प्रेक्षक मैदानात आले, तेव्हा त्यांना लव्हेंडर रंगाचे झेंडे देण्यात आले. त्यामुळे प्रेक्षक देखील गोंधळाच्या स्थितीत होते. त्यानंतर टॉसवेळी गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या लव्हेंडर रंगाच्या जर्सी घालून मैदानात आला. मात्र, अनेकांना त्याचं कारण कळालं नाही. टॉसनंतर हार्दिकने जर्सीवर स्पष्टीकरण दिलंय.
वाचा नेमकं कारण काय?
गुजरात टायटन्स आज लव्हेंडर रंगाच्या जर्सीत खेळत आहे. कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी गुजरात टायटन्सने आज लव्हेंडर जर्सीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. गुजरातच नव्हे तर हार्दिक पांड्याने हैदराबादचा कॅप्टन एडन मार्कराम याच्या दंडावर लव्हेंडर रंगाची फित बांधली. त्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत स्वागत केलं.
काय म्हणाला हार्दिक पांड्या?
कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी हा एक विशेष उपक्रम आहे. हा फक्त आमचा पाठिंबा दर्शवण्याचा आमचा मार्ग आहे, असं पांड्या म्हणतो.
पाहा ट्विट -
दरम्यान, प्रथम टॉस जिंकून हैदरबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना महत्त्वाचा असल्याने कॅप्टन पांड्याने आपला हुकमी एक्का साई सुदर्शनला मैदानात उतरवलंय. त्यामुळे आजचा सामना जिंकून गुजरात प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.