मुंबई : सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला आता एका वर्षासाठी ग्रेडनुसार पगार दिला जाणार आहे. बीसीसीआयने A+ ही नवीन ग्रेड वाढवली आहे. A+, A,B आणि C अशा 4 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत.


बीसीआयने जाहीर केलेल्या ग्रेडमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला A+ ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे तर माजी कर्णधार धोनीला A ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांना मिळणाऱ्या पगारामध्ये देखील मोठा फरक आहे. 


धोनी ग्रेड A मध्ये का ?


टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना A+ ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे. धोनीने टेस्टमधून सन्यांस घेतला आहे त्यामुळे धोनीला A+ ऐवजी A ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे.