सुरेश रैनाने अचानक CSK का सोडली? `या` खेळाडूचं नाव घेत Mr. IPL म्हणतो...
Suresh Raina: धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रैनाने देखील तडकाफडकी निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली होती. तर रैनाने 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.
Suresh Raina On Robin Uthappa: मिस्टर आयपीएल (Mr. IPL) अशी ओळख असलेला सुरेश रैना याने प्रभावी कामगिरी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 2021 साली चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली होती. 2021 च्या हंगामात काही महत्त्वाच्या सामन्यात, जसं की क्वालिफायर किंवा फायनल सामन्यात रैनाला (Suresh Raina) संघात सामील केलं नव्हतं. त्याच्याऐवजी रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली होती. त्यानंतर रैनाच्या करियरला फुलस्टॉप लागला. 2022 मध्ये रैनाला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यानंतर त्याने निवृत्तीची (Suresh Raina Retirement) घोषणा केली होती. अशातच आता सुरेश रैना याने मोठा खुलासा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (CSK vs DD) खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात 44 बॉलमध्ये 63 धावांची वादळी खेळी करत उथप्पाने चेन्नईला फायनलचा रस्ता दाखवला होता. तर फायनल सामन्यात कोलकाताविरुद्ध 15 बॉलमध्ये 3 सिक्स खेचत चेन्नईच्या विजयाला यशाची किनार लावली होती. रॉबिनने 4 सामन्यात 115 धावा केल्या होत्या. तर याच सिझनमध्ये 12 सामन्यात 160 धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनीने निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
काय म्हणाला सुरेश रैना?
एमएस धोनीने माझ्याऐवजी रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यासाठी माझी परवानगी घेतली. 2021 मध्ये संधी मिळाली नसली तरीही मी त्याला उथप्पाला माझ्या जागी आणण्यास सांगितलं, कारण त्यानं संपूर्ण हंगामात खूप मेहनत केली होती, असं सुरेश रैना म्हणाला आहे. सुरेश रैना याने जिओ सिनेमावर बोलताना याविषयी खुलासा केला आहे.
आणखी वाचा - Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!
दरम्यान, रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांचं अनोखं नातं राहिलं आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रैनाने देखील तडकाफडकी निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली होती. तर रैनाने 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. आत्तपर्यंत 200 आयपीएल (Suresh Raina IPL Career) सामन्यात 5528 धावा करणाऱ्या रैनाच्या या निर्णयानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर एक धमाकेदार शतक देखील आहे.