Team India : 'इंडियाssssss इंडियाssss', 'मुंबईचा राजा कोण....  रोsssssहित रोssssहित' या अशा उत्साही घोषणांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारतात दाखल झाल्या क्षणापासून संघातील प्रत्येक खेळाडू जेव्हाजेव्हा माध्यमांसमोर आले तेव्हातेव्हा त्यांचा उत्साहसुद्धा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पार पडलेल्या विक्ट्री परेडमध्येतर, उत्साहानं परमोच्च शिखर गाठलं होतं. लाखोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमींनी मुंबईचं मरिन लाईन्स गाठलं होतं. आपल्या आवडीच्या खेळाडूची आणि त्याहूनही त्यांच्या हाती असणाऱ्या T20 World Cup Trophy ट्रॉफीची झलक पाहण्याचाच प्रत्येकाचा प्रयत्न होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याची बाब म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने जी ट्रॉफी भारतात आणली आहे ती खरी नव्हतीच मुळी. हे तुम्हाला माहितीये का? 29 जून रोजी भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक विजेतेपद पटकावलं. ज्यानंतर संघाला विश्वचषकाची प्रतिकृती असणारी एक ट्रॉफी देण्यात आली. 


मुळात ही काही नवी बाब नाही. कारण, प्रत्यक्षात हा ट्रेंड मागील अनेक वर्षांपासून विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुरूच आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर विजेतेपद मिळवलेल्या संघाला म्हणजेच Team Indiaला फोटोशूटसाठी मूळरुपातील म्हणजेच खरी ट्रॉफी दिली जाते, पण त्यानंतर मात्र त्यांना याच ट्रॉफीची प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते.


हेसुद्धा वाचा : Video : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला? 


भारतीय संघही इथं अपवाद ठरली नाही. संघाला सामन्यानंतर लगेचच पार पडेलल्या सादरीकरण समारंभ आणि त्यानंतरच्या फोटोशूटसाठी प्रत्यक्ष ट्रॉफी देण्यात आली होती. पण, ज्यावेळी संघ भारतता परतला तेव्हा मात्र संघाला प्रतिकृती असणारी आणि अगदी मूळ ट्रॉफीसारखीच दिसणारी ट्रॉफी देण्यात आली. अर्थात या ट्रॉफीवर स्पर्धेचा लोगो आणि आयसीसीचं मानांकन असल्यामुळं तिचं महत्त्वंसुद्धा कमी नाही हे खरं. राहिला प्रश्न खरी ट्रॉफी कुठे आहे, याबाबतचा तर सध्या ही मूळ ट्रॉफी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काहीशी रंजकच आहे ना ही बाब...