Shaheen Afridi : फाटलेला शूज घालून का गोलंदाजी करतोय शाहीन? गोलंदाजाने स्वतःच केला खुलासा
Shaheen Afridi : शाहीनने ( Shaheen Afridi ) त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केलाय, ज्यामध्ये तो फाटलेला शूज घालून गोलंदाजी प्रॅक्टिस करताना दिसतोय.
Shaheen Afridi : एजबेस्टनमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये अॅशेज सिरीजमधील सामना रंगला होता. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. मात्र हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन अफरीदी आला असल्याचं दिसून आलं. शाहीनने ( Shaheen Afridi ) त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केलाय, ज्यामध्ये तो फाटलेला शूज घालून गोलंदाजी प्रॅक्टिस करताना दिसतोय.
दरम्यान शाहीनचा ( Shaheen Afridi ) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान शूज फाटला असून देखील शाहीनने का प्रॅक्टिस केली असा सवाल आता उपस्थित होतोय.
फाटलेला शूज घालून का केली प्रॅक्टिस
मुळात असा शूज घालून गोलंदाजी करणं शाहीनला ( Shaheen Afridi ) आवडत असल्याचं समोर आलंय. दरम्यान याबाबत शाहीनला ( Shaheen Afridi ) प्रश्नही विचारण्यात आला. यावर शाहीनने काय उत्तर दिलं पाहूयात.
या प्रश्नाचं उत्तर देताना शाहीन ( Shaheen Afridi ) म्हणाला की, मी माझा शूज स्वतःला कापला आहे. असं केल्यामुळे मला गोलंदाजी करण्यास मदत मिळते. त्यामुळे मला गोलंदाजी करताना कन्फर्टेबल वाटतं. आणि मला आता याची सवय झाली असून मी हे शूज बदलत नाही.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफरीदी ( Shaheen Afridi ) सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये तो टी- 20 ब्लास्ट टूर्नामेंट खेळतोय. या लीगमध्ये तो नॉटिंघमशायर टीमचा हिस्सा होता. श्रीलंकेविरूद्धच्या पाकिस्तान टेस्ट टीममध्ये त्याची निवड झाली. त्यामुळे चाहत्यांचं आता त्याच्याकडे लक्ष असणार आहे.
दुखापतीतून सावरला शाहीन
गेल्या काही दिवसांपासून शाहीन ( Shaheen Afridi ) दुखापतग्रस्त होता. गेल्या काही काळापासून तो टेस्ट सामन्यांमध्ये खेळताना दिसत नव्हता. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी पाकिस्तान टीमने शाहीन आफ्रिदीला टेस्ट टीममध्ये स्थान दिलं असून तो कसोटीत कहर करेल अशी आशा आहे.
श्रीलंकेविरूद्ध कशी असेल टेस्ट टीम?
बाबर आझम ( कर्णधार ), मोहम्मद रिझवान ( उपकर्णधार आणि विकेटकीपर ), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नोमान अली, सलमान अली आगा , सरफराज अहमद ( विकेटकीपर ), सऊद शकील, शाहीन अफरीदी और शान मसूद