मुंबई : सध्या क्रिकेट प्रेमींवर टी-२०चा फिव्हर चढलाय.  क्रिकेटच्या फिव्हरमध्ये क्रिकेट प्रेमी तर बुडालेत. यात क्रिकेटर आणि संघही मागे नाहीत. सध्याचे ताजे प्रकरण इंग्लड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनशी जोडले गेलेय. मायकेल वॉनने मंगळवारी सकाळी ट्वीट करताना भारताला गुड मॉर्निंग म्हटलेय. यावर क्रिकेट प्रेमींनीही वॉनला गुड मॉर्निंग म्हटलेय. मात्र भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या संघाने मॉर्निंग इंडियावरुन मायकेल वॉनची खिल्ली उडवलीये. वॉनची खिल्ली उडवण्यासाठी चेन्नईच्या ऑफिशियल ट्विटर हँडलचा वापर करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई संघाने वॉनला उत्तर देताना म्हटलेय, गुड मॉर्निंग मात्र तु जॉन्टी ऱ्होडसच्या मुलीला विश का करतोयस?



तुम्ही विचार करत असाल की मॉर्निंग इंडियाचा जॉन्टी ऱ्होडसच्या मुलीशी काय घेणदेणं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जाँटी ऱ्होडसने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवलेय. भारताची सभ्यता आणि संस्कृतीने प्रभावित झाल्याने त्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवलेय.यावरुन धोनीच्या संघाने वॉनची खिल्ली उडवली.