रोहित शर्माचं 10 वर्षांपूर्वीचं ट्विट का होतंय व्हायरल?
टीम इंडियाचा सलामीवीर आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय. रोहितचे हे ट्विट खास आहे कारण त्याने 10 वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाबाबत आहे.
मुंबई : नवं वर्ष 2022 वर्ष सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी विविध संकल्प केले असतील. टीम इंडियाचा सलामीवीर आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय. रोहितचे हे ट्विट खास आहे कारण त्याने 10 वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाबाबत आहे.
2012 साल सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध रोहित शर्माने एक संकल्प केला होता. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहितीही दिली आहे. 28 डिसेंबर 2011 रोजी त्याने लिहिलं, "माझा नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे काहीही गृहीत धरू नये, गिटार वाजवायला शिकायचं आहे."
रोहित शर्मा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48.96 च्या सरासरीने 9205 रन्स केले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 3 द्विशतकंही झळकावली आहेत. रोहितचा हा विश्वविक्रम आहे.
रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 3197 रन्स केले आहेत. T-20 आंतरराष्ट्रीय इतिहासात शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने या फॉरमॅटमध्ये 4 शतकं झळकावली आहेत.
याशिवाय रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनेही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सने 5 वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. या लीगमध्ये त्याने एकूण 5611 रन्स केले आहेत.
रोहित सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या कसोटी सीरीजचा तो भाग नाही आणि याचमुळे त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे कसोटीत संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.