T20 World Cup: अखेर झिम्बॉब्वेने 6 वर्षापूर्वीचा वचपा काढलाच; Mr. Bean वरून का चिडवलं जातं?
Why Pakistan tease from mr Bean ? 2016 मध्ये त्यांच्या देशात एक कार्यक्रम झाला, ज्याचं नाव होतं एग्रीकल्चर शो. या कार्यक्रमात एक पाकिस्तानी कंपनी देखील भागीदार होती. या कार्यक्रमात झालं असं की...
Pakistan Mr Bean : गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध झिम्बॉब्वे (PAK vs ZIM) सामन्यात अनपेक्षित निकाल लागला. इवलुश्या झिम्बॉब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात झिम्बॉब्वे पाकिस्तानचा 1 धावाने धुव्वा उडवला. त्यामुळे आता पाकिस्तान जवळजवळ सेमीफायनलमधून बाहेर पडल्याचं (Can Pakistan still Qualify?) चित्र आहे. केवळ 130 धावांचं टार्गेट पुर्ण न करता आल्याने पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसत आहे. अशातच आता नव्या मिस्टर बीनचं (Mr Bean) कनेक्शन समोर आलंय.
झिम्बॉब्वेच्या (Zimbabwe) सनसनाटी विजयानंतर मिस्टर बीनची (Mr Bean) एकच चर्चा होताना दिसत आहे. या दक्षिण-पूर्व आफ्रिकन देशाचे अध्यक्ष इमर्सन नंगाग्वा (Emmerson Mnangagwa) यांनीही मिस्टर बिनचं नाव घेऊन पाकिस्तानच्या जखमेवरील खपली काढली. मिस्टर बीन सारख्या प्रसिद्ध कॅरेक्टरचं क्रिकेट कनेक्शन काय आहे?, असा सवाल अनेकांना पडला होता. हे प्रकरण नेमकं काय हे जाणून घेऊया...
पाकिस्तानला 'Mr Bean'वरून का चिडवतात ?
सध्या एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचं नाव न्गुगी चासुरा (Ngugi Chasura) आहे. झिम्बाब्वेमध्ये राहणार्या या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये त्यांच्या देशात एक कार्यक्रम झाला, ज्याचं नाव होतं एग्रीकल्चर शो. या कार्यक्रमात एक पाकिस्तानी कंपनी देखील भागीदार होती. या कार्यक्रमात झालं असं की...
या कार्यक्रमात मिस्टर बीनची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारा ब्रिटीश अभिनेता रोवन ऍटकिन्सन (Rowan Atkinson) पाहुणा म्हणून येणार होता, पण पाकिस्तानी लोकांनी त्यांचा बनावट मिस्टर बीन म्हणजेच रोवन ऍटकिन्सनसारखा दिसणारा पाकिस्तानी कॉमेडियन (Pakistani comedian) कार्यक्रमात पाठवला. तेव्हापासून झिम्बाब्वेचे कलाप्रेमी पाकिस्तानवर नाराज होते. आता पाकिस्तानच्या पराभवानंतर झिम्बाब्वेचा जुना बदला 6 वर्षांनी पूर्ण झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये पाकिस्तानला 'मिस्टर बीन' म्हणत सेहवागने खिल्ली उडवली. त्यानंतर आता जगभरात पाकिस्तानची नाचक्की होताना दिसत आहे.