The Ashes 2023: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या (Eng vs Aus) अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात मजबूत आघाडी घेतली आहे. उस्मान ख्वाजाने 321 बॉलचा सामना करून 141 धावा केल्या. शकत झाल्यानंतर त्याने जंगी सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने बॅट फेकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शतकानंतर बॅट हवेत फेकून सेलिब्रेशन करण्यामागचं कारण सांगत ख्वाजाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावेळी त्याने ट्रोलर्सला देखील खडेबोल सुनावले आहेत.


काय म्हणाला उस्मान ख्वाजा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियामध्ये काय ट्रेंड होत आहे ते मी वाचत नाही. जेव्हा मी मैदानावर जातो आणि नेटवर जातो, तेव्हा इंग्लंडमध्ये धावा करता येत नाहीत, असं नेहमी म्हटलं जात होतं. मला ट्रोल केलं जात होतं किंवा तशी चर्चा होती. त्यामुळं मला वाटतं की हे शतक माझ्यासाठी नेहमीपेक्षा थोडं अधिक भावनिक होतं, असं उस्मान ख्वाजा म्हणाला आहे.


आणखी वाचा - T20 Blast: ब्रॅड क्युरीने घेतला सुपरमॅन कॅच! डोळ्याचं पारणं फेडणारा Video पाहिलात का?


इंग्लंडमधील अॅशेस दौऱ्याचं सेलिब्रेशन आणि त्यातील 2 दौरे बाहेर बसावं लागल्याने शतक झाल्याचा आनंद होता. असं नाही की माझ्याकडं सिद्ध करण्यासाठी काही नाही, पण मैदानावर जाऊन ऑस्ट्रेलियासाठी धावा करणं माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. टीम मधील युवा खेळाडू मला तरूण ठेवतात. त्यांच्यामुळे मला आनंदात मैदानात खेळता येतंय, असंही उस्मान ख्वाजा म्हणाला आहे.



दरम्यान, पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावानंतर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पोहोचला. यावेळी त्याच्या सोबत त्याची चिमुकली 3 वर्षांची मुलगी आएशा देखील उपस्थित होती. यावेळी प्रश्नांना उत्तर देताना त्याचा आणि आएशाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. माझी मुलगी माझ्यापासून दूर राहू शकत नाही, असं उस्मान ख्वाजा म्हणाला आहे.