टॉसनंतर खेळाडू पॉझिटिव्ह, सामना रद्द, कोरोनामुळे हा दौरा स्थगित होणार?
कोरोनाचं संकट असताना सर्वतोपरी काळजी घेऊन क्रिकेटचे सामने होत आहेत. मात्र एक धक्कादायक गोष्ट सामना सुरू होत असताना समोर आली.
मुंबई: कोरोनाचं संकट असताना सर्वतोपरी काळजी घेऊन क्रिकेटचे सामने होत आहेत. मात्र एक धक्कादायक गोष्ट सामना सुरू होत असताना समोर आली. सामन्याचा टॉस झाला आणि कोरोना रिपोर्ट आला. या रिपोर्टनुसार एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि पूर्ण वन डे सामना रद्द करावा लागला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन डे सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला. दुसर्या वन डे सामन्यात टॉसनंतर लगेचच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं दोन्ही संघांमध्ये खळबळ उडाली. पहिला बॉल टाकण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
वेस्ट इंडिजने यासंदर्भात माहिती दिली आहे. वेस्टइंडिज क्रिकेट टीमचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सामना रद्द करावा लागला. कोरोना चाचणीचा रिपोर्ट टॉस झाल्यानंतर आल्यानं सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाच्या बांग्लदेश दौऱ्यावरही यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ऑस्ट्रेलिया संघ शनिवारी शेवटचा वन डे सामना खेळून बांग्लादेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र या सगळ्या प्रकारामुळे आता बांग्लादेश दौरा स्थगित होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्याचं नाव वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डनं दिलेलं नाही. त्यामुळे कोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. आयपीएल देखील कोरोनामुळे स्थगित करावं लागलं होतं. आता UAEमध्ये उर्वरित 31 सामने सप्टेंबर महिन्यात होणार आहेत.