मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने तिसरा सामना 7 गडी राखून जिंकून ही आघाडी घेतली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा मोठा धक्का बसला. तो म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा 5 चेंडूत केवळ 11 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. मात्र आता बीसीसीआयने रोहितच्या फिटनेसबाबत अपडेट देत चाहत्यांना दिलासा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर हिटमॅनच्या सराव सेशनचा एक फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसतोय, तर ऋषभ पंत त्याला नेटबाहेर उभा राहून त्याचा सराव बघताना दिसतोय.


भारतीय कर्णधाराचा हा फोटो पोस्ट करत बीसीसीआयने लिहिलंय की, 'रोहित शर्मा फलंदाजी करतोय आणि ऋषभ पंत पाहतोय.'



रोहित शर्मा शेवटच्या दोन टी-20 सामन्यांसाठी तंदुरुस्त 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिसर्‍या टी-20 दरम्यान रोहित शर्माला झालेली दुखापत फारशी गंभीर नाही. रोहित शर्मा आता तंदुरुस्त झाला असून तो आज होणाऱ्या टी-20 सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवी टी-20 सामना होणार आहे. दोन्ही सामने फ्लोरिडामध्ये खेळवले जातील.