मुंबई : क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम भारताचा 'कूल' कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विक्रमानंतर महेंद्रसिंग धोनीला येत्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजून एक  विक्रम खुणावत आहे.  
श्रीलंका दौऱ्यावर सर्वाधिक स्टॅम्पिंग करण्याचा विक्रम धोनीने बनवला आहे. यानंतर एकदिवसीय मालिकेत धोनीला दहा हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०१ एकदिवसीय सामन्यात धोनीने आतापर्यंत ५२.२० च्या सरासरीने ९६५८ धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म उत्तम राहिल्यास येत्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एकदिवसीय मालिकेत त्याला दहा हजार धावांचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे.


भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आहे.  कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा महेंद्र सिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. भारत -ऑस्ट्रेलिया४० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना दोन शतकी खेळींच्या मदतीने धोनीने १२०४ धावा केल्या होत्या. 


सचिन तेंडूलकर, कुमार संगकारा, रिकी पॉन्टिंग समवेत ११ खेळाडूंनी एकदिवसीय मालिकेत दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.