नवी दिल्ली : कॉफी विथ करण या कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तसेच या प्रकरणामुळे या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सीरिजसाठी निलंबित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातून टीका होत असताना, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या आधी या प्रकरणावर कॅप्टन कोहलीने देखील टिप्पणी केली होती. या नंतरच या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. इतकेच कमी की काय हॉटस्टारने आपल्या वेबसाईटवरुन तो आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांड्याला संघात येऊन किती वर्ष झाली आहेत, त्याला संघाच्या संस्कृतीबद्दल किती माहिती आहे असे सवाल या खासगी वाहिनीला दिलेल्या कार्यक्रमात हरभजननं उपस्थित  केले. माझ्या सोबत माझी बायको आणि मुलीसोबत बसने प्रवास करावा लागला आणि त्या बसमध्ये हे दोघे असतील तर मी त्या बसमधून प्रवास करणार नाही, अशी भूमिका हरभजनने घेतली. महिलांना फक्त एकाच दृष्टीकोनातून पाहणं चुकीच असल्याचे हरभजन म्हणाला.


काय म्हणाला हरभजन?


एका वाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला की, आम्ही मित्रांसोबत देखील अशा भाषेत बोलत नाही, ज्या भाषेत हे टेलिव्हिजनवर बोलले आहेत. यामुळे प्रेक्षकांना देखील प्रश्न पडेल की, सर्व क्रिकेटपटू असेच असतात की काय. अनिल कुंबळे, हरभजन सिहं आणि सचिन तेंडूलकर देखील असेच होते का? असे देखील प्रेक्षकांना वाटू शकते. या दोघांवर योग्य ती कारवाई केली गेली आहे, असं हरभजनला वाटतंय. तसंच या निलंबनाच्या कारवाईचं हरभजनने समर्थन केलं.


अधिक वाचा : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलचं वनडे सिरीजमधून निलंबन